आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंडोमच्या जाहिराती आता टीव्हीवर रात्री 10 ते 6 दरम्यानच दाखवा, केेंद्र सरकारचे चॅनल्सला आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ नवी दिल्ली - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतामध्ये टीव्हीवर कंडोमच्या जाहिराती दाखवण्यासाठी मंत्रालयाने एक निश्चित वेळ ठरवून दिली आहे. या जाहिराती एका विशिष्ट वयोगटासाठी असल्याने त्या दिवसभर टीव्हीवर दाखवण्यावर मंत्रालयाने मर्यादा घातली आहे. 

 

कोणत्या वेळेते दिसणार कंडोम जाहिरात
- केंद्र सरकारने टीव्हीवर कंडोम जाहिरात दाखवण्यासाठी वेळ ठरवून दिली आहे. त्यावेळेतच अशा जाहिरातींचे प्रसारण होईल असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे. 
- सरकारने या जाहिरातींसाठी रात्री 10 ते सकाळी 6 ही वेळ निश्चित केली असून या वेळेतच जाहिराती दाखवाव्यात, असे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत.

 

का दिले असे आदेश 
- लहान मुलांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या किंवा त्यांना हानिकारक गोष्टींविषयी रुची निर्माण करणाऱ्या जाहिरातींना परवानगी दिली जाऊ नये.  या नियमाअंतर्गत हा आदेश देण्यात आला आहे. 
- कंडोमच्या जाहिराती या एका विशिष्ट वयोगटातील व्यक्तींसाठी आहेत. त्या लहान मुलांसाठी निरुपयोगी आहेत. त्यामुळे त्या रात्री 10 ते सकाळी 6 या रात्रीच्या वेळेतच दाखवल्या जाव्यात, अशा सूचना केंद्र सरकारने टीव्ही चॅनल्सला केल्या आहेत. 

 

याआधीही झाला विरोध... 
- बॉलिवूड अॅक्ट्रेस सनी लिओनी एका कंडोम निर्माता कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडिर आहे. नवरात्रीच्या काळात गुजरातमधील प्रमुख रस्त्यांवर आणि गरबा उत्सवांच्या बाहेर सनीचे फोटो असलेल्या जाहिराती झळकल्या होत्या त्याला गुजरातमध्ये मोठा विरोध झाला होता. 
- याशिवाय मुंबईत अभिनेत्री राखी सावंत हिने रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या सनीच्या कंडोम जाहिराती काढण्याची मागणी केली होती. 

बातम्या आणखी आहेत...