आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुस-यांदा बाबा होणार आहे शाहिद, 20 महिन्यांच्या मुलीचा फोटो शेअर करुन दिली गुड न्यूज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांच्याकडे गुड न्यूज असून हे दाम्पत्य आता दुस-यांदा आईबाबा होणार आहेत. शाहिदने सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय क्यूट अंदाजात ही गोष्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शाहिदने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याची लाडकी लेक मीरा दिसतेय. तिच्याशेजारी फुग्यांचे चित्र रेखाटण्यात आले आणि त्यावर बिग सिस्टर असे लिहिण्यात आले आहे. दोन तासांच्या आत या फोटोला पाच लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आणि शाहिद-मीरावर शुभेच्छांचा वर्षाव केला. 


आता 20 महिन्यांची आहे शाहिदची मुलगी...
- शाहिद आणि मीरा यांची मुलगी मीशा आता फक्त 20 महिन्यांची आहे. 26 ऑगस्ट 2017 रोजी मीशाचा पहिला वाढदिवस साजरा झाला. शाहिद आणि मीरा यांचे 7 जुलै 2015 रोजी लग्न झाले. लग्नाच्या 12 महिन्यांत मुलगी मीशाचा जन्म झाला.


पुढे वाचा, अलीकडेच बेबी बंपसोबत दिसली होती मीरा... 

बातम्या आणखी आहेत...