आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीला श्रद्धांजली देत काँग्रेसने म्हटले असे काही, फॅन्स भडकले; Delete केले ट्वीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - श्रीदेवीच्या अचानक झालेल्या निधनावर पीएम मोदी, अमिताभ बच्चन आणि असंख्य लोकांकडून ट्विटवर शोक व्यक्त केला जात आहे. पण, काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आलेला शोक संदेश वाचून फॅन्स भडकले आहेत. काहींनी तर या ट्वीटवरून काँग्रेसला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तर, काहींनी अभिनेत्रीच्या मृत्यूवर सुद्धा काँग्रेस राजकारण करत असल्याचे आरोप लावले. यानंतर नाइलाज म्हणून काँग्रेसला आपले ट्वीट डिलीट करून दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे. 

 

- काँग्रेसने ट्वीट करून लिहिले, "श्रीदेवीच्या निधनाचे वृत्त ऐकूण आम्ही शोकाकुल आहोत. एक हरहुन्नरी अभिनेत्री आपल्या अॅक्टिंग आणि जबरदस्त कामगिरीमुळे सदैव आठवणींमध्ये जिवंत राहील. त्यांच्या कुटुंबियांना सद्भावना... श्रीदेवीला यूपीए सरकारने 2013 मध्ये 'पद्मश्री' पुरस्कार देऊन सन्मानित केले होते."
- हेच ट्वीट वाचून लोक भडकले आणि त्या ट्वीटला रीट्वीट करून आणि उत्तर देऊन आपला रोष व्यक्त केला. परिणामी काँग्रेसला आपल्या अधिकृत ट्विटर पेजवरून ती पोस्ट डिलीट करावी लागली. 


असा काढला राग
- काँग्रेस एका अॅक्टरला श्रद्धांजली वाहताना सुद्धा आपण त्यांना पद्मश्री दिले होते असा उल्लेख कसा करू शकते याचाच लोकांना राग आला. 
- काँग्रेसला किमान या गोष्टीवर राजकारण टाळता आले असते. पण, त्यांनी एका सेलिब्रिटीच्या निधनावर सुद्धा अतिशय लज्जास्पद ट्वीट केले. असे एका यूझरने म्हटले.
- आणखी एका म्हटले, "काँग्रेसमध्ये आत्मसन्मान उरला असे वाटत नाही. त्यामुळे, ते जे काही करताच त्याची चिंता करत नाहीत. त्यांच्यात काही उरले असेल तर ते फक्त राजकारण..."

 

पुढे वाचा, आलेल्या संतप्त प्रतिक्रिया आणि काँग्रेसने डिलीट केलेले ते ट्वीट...

बातम्या आणखी आहेत...