आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bollywood 5 Update: मुलगी सोनमच्या चित्रपटात रोमान्स करणार अनिल आणि जूही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: अनिल कपूर आणि जूही चावला पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. दोघांची जोडी प्रेक्षकांनी 'दीवाना-मस्ताना', 'लोफर', 'बेनाम बादशाह' आणि 'कारोबार'मध्ये पाहिली आहे. प्रेक्षकांना ती पसंतही पडली आहे. दोघं पुन्हा एकदा 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'मध्ये एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट अनिल कपूरसाठी खास आहे. कारण तो यामध्ये मुलगी सोनमसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. चित्रपटाचे नाव '1942: अ लव्ह स्टोरी'चे बोल 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' असे ठेवण्यात आले आहे. चित्रपटाच्या गाण्याचे नवीन व्हर्जनही ऐकायला मिळणार आहे. 


बॉलिवूड ब्रीफमध्ये जाणून घ्या इंडस्ट्रीमध्ये अजुन काय खास झाले...


1. ट्विटरवर शेअर केले पोस्टर्स
चित्रपटात अनिल आणि जूही रोमान्स करताना दिसणार आहे. दोन्ही अॅक्टर्सने आपले पोस्टर ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. अनिलने शेअर करत लिहिले  'बलबीर चौधरी एक ऐसा शख्स है जिसका दिल सोने का है और वह जिंदादिल है।' तर जूहीने पोस्ट शेअर करत आपल्या भूमिकेविषयी प्रेक्षकांना हिंट दिली. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'चत्रो अपने चार्म से दिल चुरा लेती है।
- 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' की कथा एका अशा मुलीची कथा आहे, जी तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी नाही. याच काळात तिला तिच्या वडिलांच्या अनैतिक संबंधांविषयी समजते. हा चित्रपट 12 ऑक्टोबर 2018ला रिलीज होणार आहे.

 

2. सर्जिकल स्ट्राइकवर चित्रपटात मिळाल्या भूमिका
मनोज वाजपेयी याला सर्जिकल स्ट्राइकवर तयार होणा-या चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. मनोज म्हणाला - "मी सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडिओ पाहिला नाही, कारण मी टीव्ही पाहत नाही. जर सर्जिकल स्ट्राइटवर एखादा चित्रपट तयार होत असेल, तर काम करण्याची इच्छा आहे. मनोज म्हणाला की, खुप कमी स्क्रिप्ट अशा असतात, ज्या आपले लक्ष आकर्षित करतात. अनेक घटनांवर कथा लिहिल्या जातात, परंतू दमदार कथा खुप कमी असतात. सर्जिकल स्ट्राइकची घटना पडद्यावर दमदार पध्दतीने उतरवली आणि अशी कथा मिळाली तर अवश्य चित्रपट करण्याची इच्छा आहे."
- मनोज वाजपेयीने सत्यमेव जयते चित्रपटात जॉन अब्राहमसोबत काम केले आहे. 'सत्यमेव जयचे' 15 ऑगस्टला रिलीज होईल.


3. आमिरनंतर सलमानसोबत धूममध्ये दिसणार कतरिना
बार्बी गर्ल कतरिना कैफ सिल्वर स्क्रीनवर धूम चित्रपटातून चाहत्यांना दिसू शकते. फिल्ममेकर आदित्य चोप्रा धूम सीरिजचा चौथा चित्रपट बनवणार आहेत. यशराज बॅनरखाली हा धूम-4 चित्रपट तयार होणार आहे. यामध्ये सलमान खान आणि रणबीर सिंह फायनल होऊ शकतात. तसेच या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफची जोडी दिसू शकते.
- आदित्यने चित्रपटाची कास्ट फायनल केली आहे. काही दिवसांत याची अधिकृत घोषणा होईल. या प्रोजेक्टविषयी सलमान आणि आदित्य चोप्रा यांच्यामध्ये एकवर्षापासून बातचित सुरु आहे. 2020 मध्ये हा चित्रपट रिलीज होऊ शकतो.


4. अक्षय कुमारच्या 'भारत के वीर-अल्ट्रा मैराथन'मध्ये पोहोचली कश्मीर
शहीद जवानांचा समर्पित असणारा अक्षय कुमारचा 'भारत के वीर अल्ट्रा मॅराथॉन' जवळपास 7 महिन्यात 24 राज्यांमध्ये पोहोचली आहे. 14,500 किलोमीटचा प्रवास केल्यानंतर शुक्रवारी ही मॅराथॉन श्रीनगर येथे पोहोचली. सीमा सुरक्षा बल(बीएसएफ)चे उपमहानिरिरीक्षकने एक डिसेंबर 2017 ला अटारी-वाघा जॉइंट चेक पोस्टमधून मॅराथॉनला रवाना केले होते.

 

6. ब्रिटिश मॅग्जीनची कव्हर गर्ल बनली दीपिका पदुकोण
मॅग्जीनच्या कव्हरवर दीपिका गॉर्जिअस दिसतेय. दीपिकाने 'पद्मावत' चित्रपटातून या वर्षाची धमाकेदार सुरुवात केली होती. चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. दीपिका 100 प्रभावी व्यक्तींच्या यादीमध्ये येणारी एकमेव अभिनेत्री आहे. 
- दीपिकाने मे महिन्यात झालेल्या कान फिल्म फेस्टिव्हल 2018 मध्ये आपल्या शानदार एंट्रीने सर्वांची मनं जिंकली होती.

 

 

बातम्या आणखी आहेत...