आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाडीवेळी ओरडत राहिली झायरा वसीम, यामुळे मदतीसाठी येऊ शकले नाही क्रू मेंबर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'दंगल' (2016) फेम झायरा वसीमवर एक वाईट प्रसंग ओढावला होता. फ्लाइटमध्ये तिच्यासोबत छेडछाडीचे प्रकरण समोर आले आहे. रविवारी आरोपीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली असून, राज्याच्या महिला आयोगाने डीजीसीए, एअरलाइन्स आणि महाराष्ट्र पोलिस यांना या प्रकरणी कठोर कारवाई करण्यासाठी पत्र दिले आहे. या दरम्यान एक नवीन बाब समोर आली आहे. प्लेन लँडिगवेळी झायराने फ्लाइटच्या क्रू मेंबर्सला घडलेल्या प्रकाराची तक्रार केली होती, मात्र तिच्या तक्रारीनंतरही तिला कोणी मदत केली नाही. 

 

यामुळे क्रू मेंबर्स करु शकले नाही मदत... 
- सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी प्रवाशाने आधीच क्रू मेंबर्सला सांगितले होते की तो झोपत आहे आणि त्याला कोणी डिस्टर्ब करु नये. 
- आरोपी F2 सीटवर तर झायरा F1 सीटवर बसलेली होती. संपूर्ण प्रवासात आरोपी झायरासोबत छेडछाड करत होता. 
- सूत्रांनी सांगितल्यानुसार, फ्लाइट लँड होत होते तेव्हा झायरा ओरडली होती, त्यासोबत सह प्रवाशावरही ओरडत होती, मात्र लँडिगची होत असल्यामुळे सर्व क्रू मेंबर्सने सीट बेल्ट बांधलेले होते. 
- नियमानुसार प्लेन लँड होत असताना विमानात इकडे-तिकडे जाता येत नाही. त्यामुळे झायराने तक्रार केल्यानंतरही कोणी तिच्या मदतीला येऊ शकले नाही. 
- एअरलाइन्सच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, लँडिगच्या आधी झायराने तक्रार केली नव्हती आणि लँडिंगनंतर झायराला तक्रार नोंदवण्यास सांगण्यात आले तेव्हाही तिने तक्रार दिली नाही. 
- ज्या एअरलाइन्समध्ये हा प्रकार झाला त्या विस्तारा एअरलाइन्सच्या वतीने सांगण्यात आले आहे की त्यावेळी फ्लाइटमध्ये जेवढे क्रू मेंबर्स होते त्या सर्वांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. 

 

काय आहे प्रकरण 
- झायरा वसीम विस्तार एअरलाइन्सच्या फ्लाइटने दिल्लीहून मुंबईला येत होती. 
- फ्लाइटमध्ये तिच्या मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने तिला चुकीचा स्पर्ष केल्याची तिची तक्रार आहे. 
- या प्रकरणाची माहिती झायराने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन दिली आहे. 
- फ्लाइटमध्ये तिच्यासोबत जे काही घडले ते सांगताना झायराला अश्रू अनावर झाले होते. सह प्रवाशी आणि क्रू मेंबरही मदतीला आले नसल्याचे झायराने व्हिडिओ मध्ये म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...