आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Date Fixed: या दिवशी होणार दीपिका-रणवीरच लग्न, तारीख आली समोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडच्या क्यूट कपलपैकी एक कपल म्हणजेच रणबीर-दीपिकाच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे. दोघांची क्यूट केमिस्ट्री प्रेक्षकांना मोठ्या पडदयावर पसंत पडते. परंतू ऑफस्क्रिनही दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना आवडते. ही जोडी गेल्या 5 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चाही अनेक वेळा होत असतात. दोघांच्या रिलेशनशीपविषयी दोघांनीही प्रत्यक्षरित्या कबूली दिलेली नसली तरी दोघंही आपल्या नात्याविषयी खुप सहज आहेत. परंतू आता हे कपल ख-या आयुष्यात कधी एकत्र येणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना आतुरता लागली आहे. 

 

'या' दिवशी करणार लग्न
'फिल्मफेअर'ने प्रसिध्द केलेल्या वृत्तानुसार नोव्हेंबर महिन्याच्या 10 तारखेला हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नाची तारीख ठरवण्यासाठी दीपिका आणि रणवीरने खास वेळ काढला. त्यांना अगदी व्यवस्थितपणे आपले लग्न करायचे आहे. यामुळे दोघांच्या वेळा ठरवून त्यांनी 10 नोव्हेंबरला लग्न करण्याचे ठरवले आहे. 


पद्मावतच्या रिलीजनंतर ठरले सर्व
- रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, दोघांचा पद्मावत हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे लग्नाबाबत बोलणे झाले होते. त्याचदरम्यान असे ठरले की, दीपिका आणि रणवीर यांचे लग्न या वर्षाच्या अखेरीपर्यंत केले जावे. 
- तसे पाहता अद्याप लग्नाची तारीख ठरलेली नाही. रणवीरच्या वडिलांचे नाव जगजित सिंह आणि आईचे नाव अंजू भवानी आहे. तर दीपिकाच्या आईचे नाव उज्जवला आणि वडिलांचे नाव प्रकाश पादुकोण आहे. 
- दीपिकाचे वडिल प्रकाश पादुकोण नॅशनल बॅडिमिंटन चॅम्पियन राहिलेले आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...