आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पद्मावत\'च्या स्क्रिनिंगला जुन्या ड्रेसमध्ये पोहोचली दीपिका, यापूर्वीही अनेकदा रिपीट केले आहेत ड्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी अलीकडेच मुंबईत 'पद्मावत' या चित्रपटाचे पहिले स्क्रिनिंग ठेवले होते. यावेळी दीपिका फॅशन डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाइन केलेल्या ऑफ व्हाइट कलरच्या अनारकली सूटमध्ये दिसली. या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य खुलून आले होते. गोल्डन इअररिंग्स आणि सिंपल मेकअपने तिने तिचा हा लूक पूर्ण केला होता. पण दीपिकाने हाच ड्रेस काही वर्षांपूर्वीसुद्धा परिधान केला होता. 2013 मध्ये चेन्नई एक्स्प्रेस या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये दीपिका पहिल्यांदा याच ड्रेसमध्ये दिसली होती. तब्बल पाच वर्षांनी दीपिकाने हा ड्रेस रिलीट केला. विशेष म्हणजे यापूर्वीही अनेकदा दीपिकाने तिचे ड्रेसेस रिपीट केले आहेत.

 

स्क्रिनिंगला रणवीरचा हात पकडून पोहोचली होती दीपिका.. 

- स्क्रिनिंगला दीपिका तिचा बॉयफ्रेंड रणवीर सिंहसोबत दाखल झाली होती. दोघेही एकमेकांचा हात पकडून येथे पोहोचले होते. यावेळी रणवीर सफेद कलरच्या चुडीदार पायजामा-कुर्त्यात दिसला होता. रणवीरच्या आईवडिलांनीही स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. 
- स्क्रिनिंगला शाहिद कपूरचे कुटुंबीय पोहोचले होते. शाहिदची पत्नी मीरा राजपूत, वडील पंकज कपूर, सावत्र आई सुप्रिया पाठक, सख्खी आई नीलिमा आझमी, सावत्र भाऊ ईशान खट्टर यावेळी उपस्थित होता.
- दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, त्यांच्या मातोश्री लीला भन्साळी, बहीण बेला भन्साळी स्क्रिनिंगला दिसल्या.
- याशिवाय पद्मिनी कोल्हापुरे, रिचा शर्मा यांनीही यावेळी हजेरी लावली होती.


पुढील स्लाईड्सवर बघा, दीपिकाने यापूर्वी कोणकोणते आउटफिट्स रिपीट केले...  

बातम्या आणखी आहेत...