आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉप ट्रेंडिंग सेलिब्रिटीजमध्ये आहे बॉलिवूडचे हे लव्हली कपल, यांना टाकले मागे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आघाडीची बॉलिवूड अभिनेत्र दीपिका पदुकोण आणि अक्षिनेता रणवीर कपूरची सध्या सगळीकडेच चर्च आहे. बॉलिवूडमधल्या या लव्हली कपलचा 'पद्मावत' हा चित्रपट मागच्या आठवड्यातच रिलीज झालाय. प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगली पसंती देत आहेत. याच कारणांमुळे दीपिका आणि रणवीर सध्या चर्चेत आहेत. दोघेही टॉप ट्रेंडिंग सेलिब्रिटीजमध्ये आघाडीवर आहेत. या सेलिब्रिटींना टाकले मागे...

 

- अमेरिकेच्या मीडिया-टेक कंपनी स्कोर ट्रेंड्सचे विश्लेषण करण्यासाठी लाखो ठिकाणांहून डेटा एकत्रित करते आणि त्यावर विश्लेषण करते. त्यांच्या नुकत्याच एकत्रित केलेल्या टेडानुसार, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह या आठवड्याच्या चार्टवर फर्स्ट पोझिशनवर आहेत. 19 जानेवारी ते 25 जानेवारीच्या काळातील उपलब्ध डाटामध्ये रणवीर सिंह 81.25 पॉइंट मिळवून नंबर एकला आहेत. रणवीरने अक्षय कुमारला 0.22 अंकांनी मागे टाकलेय. तर अभिनेत्रींच्या यादीत दीपिका पादुकोण या आठवड्यात 95.80 अंकानी पहिल्या स्थावर आहे. प्रियंका चोपडाला दीपिका पदुकोणने 35.98 या मोठ्या अंतरांनी मागे टाकलेय.

- स्कोर ट्रेंड्समध्ये सेलिब्रिटी विविध उप-श्रेणिंमध्ये वर्गीकृत होत असतात. दीपिका आणि रणवीर 'युथफुल' श्रेणीमध्ये पहिल्या स्थानावर आहेत. प्रियंका चोप्रा 'प्राइम' आणि अक्षयकुमार 'मॅच्यूअर' श्रेणीमध्ये पुढे आहेत. सिनिअर्स श्रेणीमध्ये माधुरी दिक्षित आणि अजय देवगन सर्वात पुढे आहेत.
- सोनम कपूर 'युथफुल' श्रेणीमध्ये 22.75 अंकानी दूस-या स्थानावर आहे. तर आलिया भट् 12.68 अंकानी नवव्या स्थानावर आहे. शाहरुख 57.51 अंकांसोबत तिस-या स्थानावर आहे. शाहिद कपूर पुरुष श्रेणीमध्ये 48.72 अंकांनी पाचव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे सममान आणि आमिर खान या आठवड्यात सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत.
- मीडिया-टेक स्पेसमध्ये, स्कोर ट्रेंड्ससाठी डेटा आणि एग्लोरिदम महत्त्वाची भूमिका पार पाडतात. अॅटोमेटेड एग्लोरिदममधून प्रत्येक सेलेब्रिटीच्या बाबती निष्पक्ष स्कोर मिळण्यात मदत होते. 
- मशीन लर्निंग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजेंससारख्या तंत्रज्ञानामुळे डेटा काउंटिंगच्या वेळी सेलिब्रिटीविषयी डेटा शोधणे आणि प्रत्येक आठवड्यात त्यांचे स्कोर काउंट करणे सोपे जाते. 
- स्कोर ट्रेंडचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात की, मागच्या आठवड्यात रणवीर आणि दीपिका सर्व सोशल प्लॅटफॉर्म, प्रकाशन, माध्यम आणि डिजिटल माध्यमांमध्ये ट्रेंडींगमध्ये होते. आता ट्रेंड्सच्या अंदाजानुसार या आठवड्यात त्यांचा 'पद्मावत' चित्रपटाचे यश पाहता हे दोघेही अग्रस्थानी आहेत.
- या सर्व अंकांविषयी अश्वनी कौल यांना विचारण्यात आले, ते म्हणाले की, "हे नंबर्स फेसबुक, ट्विटर, प्रिंट प्रकाशन, व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसारक्या शेकडो स्त्रोतवरुन घेण्यात आले आहेत. अनेक अत्याधुनिक एल्गोरिदम या विशाल डेटाची प्रक्रिया करण्यात मदत करते. यामुळे आम्ही स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचू शकतो."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बॉलिवूडच्या या सिझलिंग कपल्सचे निवडक फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...