आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वडिलांनी मला नेहमी गाइड केले, परंतू त्यांचा सल्ला कधीच लादला नाही'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : 17 जून रोजी जगभरात फादर्स डे साजरा करण्यात आला. प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे खुप महत्त्व असते. वडील हे एक प्रेरणा असतात, मार्गदर्शक आणि छत्र असतात. कलाकारांच्या आयुष्यातही वडिलांना तेवढेच महत्त्व असते. अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या आयुष्यात वडिलांचे काय महत्त्व आहे हे आपण जाणून घेऊया.

त्यांनी व्यावसायिक कामात दखल देण्याचा प्रयत्न केला नाही. माझी निवड योग्य असेल, असा त्यांना विश्वास आहे. 


मी माझ्या डॅडीची लिटल गर्ल व सपोर्ट सिस्टिम आहे. आम्ही कधी हास्य-विनोद करतो, तर कधी एकमेकांची खेचतो. लहानपणी मी कधी खोड्या केल्या तर ते कठोर होत. कधी कधी तर स्टोअर रूममध्ये बंद करायचे. अॅथलीट असल्यामुळे ते वेगळ्या डीएनएने तयार झाले आहेत. त्यांनी मला व बहिणीला मार्गदर्शन केले. मात्र, आपला सल्ला लादला नाही. त्यांनी एकदा सांगितले होते, तुम्ही प्रत्येक प्रकारचे स्टार बनू शकता. मात्र, तुम्ही चांगले व्यक्ती नसाल तर तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवले जाणार नाही. मी निवांत असल्याचे पाहिल्यावर त्यांना आनंद होईल. मी जेव्हा बंगळुरूला असते तेव्हा ते सर्व असाइनमेंट बाजूला ठेवून माझ्यासोबत राहतात. ते खूप छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष देतात. मला विमानतळावर सोडायला येतात. घरापासून विमानतळापर्यंत जाण्यासाठी ४५ मिनिटे आमच्यासाठी बहुमोल असतात. ते माझे सर्व चित्रपट पाहतात आणि मी जे काही करेल ते त्यांना आवडते. ते माझ्या चित्रपटातून नेहमी काही ना काही चांगले काढतात. माझ्या टीकाकारांमध्ये माझी आई व बहीण आहेत. ज्या गोष्टी नियंत्रणात नाहीत त्याबाबत कधी असंतुष्ट राहायचे नाही. एखादी बाब नियंत्रणात नसेल तर त्यावर घाम गाळू नकोस, असे त्या सांगतात. 

बातम्या आणखी आहेत...