आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवॉर्ड सोहळ्यात Worst ड्रेसमध्ये पोहोचली दीपिका, माधुरी-करीना दिसल्या स्टनिंग लुकमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका, करीना, माधुरी दीक्षित. - Divya Marathi
दीपिका, करीना, माधुरी दीक्षित.

मुंबई - लक्स गोल्डन रोज अवॉर्ड-2017चा डोळे दिपवणारा सोहळा रविवारी झाला. यावेळी रेड कार्पेटवर बॉलिवूड अॅक्ट्रेसेसचा जलवा पाहायला मिळाला. यावेळी दीपिका पादुकोण ऑफ शोल्डर गोल्डन कलरच्या हाय स्लिट गाऊनमध्ये आली होती. या गाऊनचा लुक थोडा विचित्र दिसता होता. त्यासोबतच गाऊनचा गोल्डन कलरही दीपिकाला सूटकरत नव्हता. त्याचवेळी माधुरी दीक्षित ब्लॅक डीप स्लिट गाऊनमध्ये स्टायलिश लूकमध्ये दिसत होती. अवॉर्ड शोमध्ये करीना कपूर, कतरीना कॅफ, आलिया भट्ट, जॅकलीन फर्नांडिस, श्रीदेवी, जुही चावला, यामी गौतमी, भुमी पेडणेकर, मौनी रॉयसह अनेक सेलेब्स आले होते. 

दीपिका-कतरीनासह या सेलेब्सने जिंकला अवॉर्ड 

 

अनस्टॉपेबल ब्यूटी ऑफ द इअर अवॉर्ड 
- या वर्षाचा हा अवॉर्ड दीपिका पादुकोणने जिंकला. नॉमिनेशन लिस्टमध्ये कतरीना कैफ, कंगना रनोट, अनुष्का शर्मा आणि आलिया भट्ट यांचा समावेश होता. 

 

करिस्मॅटिक ब्यूटी ऑफ द इअर अवॉर्ड 
- हा अवॉर्ड कतरिना कैफने आपल्या नावे केला. या अवॉर्डसाटी ऐश्वर्या रॉय बच्चन, इलियाना डिक्रूज, सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर, प्रियंका चोप्रा यांना नॉमिनेशन मिळाले होते. 

 

आय एम मोर देन यू कॅन सी अवॉर्ड 
- या वर्षीचा हा अवॉर्ड करीना कपूरने आपल्या नावे केला. यासाठी नॉमिनेशन दीपिका, प्रियंका चोप्रा, ऐश्वर्या यांना मिळाले होते. 

 

व्हर्सिटाइल ब्यूटी ऑफ द इअर 
- या अवॉर्डसाठी निवड झाली ती आलिया भट्टची. नॉमिनेशन लिस्टमध्ये यामी गौतम, कृति सेनन, भुमी पेडणेकर यांचा समावेश होता. 

 

ब्रेक थ्रो परफॉर्मन्स अवॉर्ड 
- भुमी पेडणेकर आणि तापसी पन्नू यांना विभागून हा अवॉर्ड देण्यात आला. या लिस्टमध्ये यामी गौतम आणि श्रद्धा कपूर यांचाही समावेश होता. 

 

इमर्जिंग ब्यूटी ऑफ द इअर अवॉर्ड 
- या अवॉर्डसाठी फातिमा सना शेख आणि झायरा वसीमची निवड झाली. यासाठी दिशा पाटणी, सान्या मल्होत्रा आणि सैयामी खेर यांना नॉमिनेशन मिळाले होते. 

 

पॉवर पॅक्ड ब्यूटी ऑफ द इअर अवॉर्ड 
- श्रीदेवीने या अवॉर्डवर आपले नाव कोरले. यासाठी अनुष्का शर्मा, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा यांना नॉमिनेशन मिळाले होते. 

 

द टाइमलेस ब्यूटी अवॉर्ड 
- सुष्मिता सेन, माधुरी दीक्षित, जुही चावला, ऐश्वर्या रॉय, श्रीदेवी यांच्यामध्ये टाइमलेस ब्यूटी म्हणून सहाजिकच माधुरीची निवड झाली आहे. 

 

द लिजेंड्री ब्यूटी अवॉर्ड 
- हा अवॉर्ड जुही चावला हिला मिळाला. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, लक्स गोल्डन रोज अवॉर्ड-2017 मध्ये अवतरलेले तारांगण... 

बातम्या आणखी आहेत...