आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'धडक\' ट्रेलर: श्रीदेवीच्या मुलीने डेब्यू चित्रपटात को-स्टारला केले Kiss

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई :  जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर स्टारर बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित  'धडक' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'सैराट' या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. शशांक खेतान यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून धर्मा प्रोडक्शनची निर्मिती आहे.  ईशान आणि जान्हवीसह मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते आशुतोष राणा यांची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बघायला मिळतेय. 3 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जान्हवी आणि ईशानच्या रोमँटिक केमेस्ट्रीसह प्रेम टिकवण्यासाठी केलेला संघर्ष बघायला मिळतोय. सैराटमधील गाजलेल्या झिंगाट गाण्याची खास झलक बघायला मिळतेय. 

 

मुंबईत लॉन्च झाला ट्रेलर

आज मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडतोय. या ट्रेलर लॉन्चला ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर चित्रपटातील लूकमध्ये  पोहोचले. याशिवाय करण जोहर, संगीतकार अजय-अतूल, दिग्दर्शक शशांक खेतान, ईशान खट्टरच्या आई नीलिमा आजमी, जान्हवी कपूरचे कुटूंबीय उपस्थित आहेत. 

 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ट्रेलर लॉन्चिंग इव्हेंटचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...