आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'धडक\' ट्रेलर रिलीजपुर्वी अर्जुन कपूर झाला भावूक, बहीण जान्हवीची मागितली माफी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरचा डेब्यू चित्रपट 'धडक' चा ट्रेलर आज (सोमवारी) रिलीज झाला. हा दिवस जान्हवीच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे. आता ती बॉलिवूड चित्रपट इंडस्ट्रीचा भाग बनणार आहे. 'धडक' ट्रेलर रिलीजपुर्वी जान्हवीचा मोठा भाऊ अर्जुन कपूर इमोशनल झाला. त्याने ट्वीट करुन बहिणीसाठी मॅसेज लिहिला.


बहिणींसोबतचा फोटो पोस्ट करुन अर्जुनने असे लिहिले
- अर्जुनने ट्वीट केले की, 'जान्हवी तू आता नेहमीसाठी ऑडियन्सचा भाग बनणार आहे. कारण तुझ्या चित्रपटाचा ट्रेलर येणार आहे. सर्वात पहिले मी माफी मागतो की, मी तुझ्यासोबत मुंबईत नाही, परंतू नेहमी तुझ्यासोबत राहिल, काळजी करु नकोस' (Tomorrow you will be part of the audience forever #JanhviKapoor cause your trailer comes out... Firstly, sorry I’m not there in Mumbai but I’m by your side, don’t worry.)
- अर्जुनने तिघी बहीणी म्हणजेच जान्हवी, खुशी आणि अंशुलासोबत हा फोटो पोस्ट करत मॅसेज लिहिला. त्याने लिहिले की, 'मला तुला सांगायचे आहे की, हे खुप चांगले प्रोफेशन आहे. यासाठी तुला कठोर मेहनत, प्रामाणिकपणे काम आणि सर्वांच्या विचारांचा आदर करणे शिकावे लागेल. हे सर्व सोपे नाही. पण मला माहिती आहे की, तु या सर्वांसाठी तयार आहेस.'
- अर्जुनने लिहिले, ''धडक'च्या ट्रेलरसाठी खुप शुभेच्छा. मला पुर्ण विश्वास आहे की, माझे मित्र शशांक खेतान आणि करण जोहर तुला आणि ईशान खट्टरला रोमियो-ज्यूलिएटच्या रुपात सादर करतील.'
- 'धडक' चित्रपट 20 जुलैला रिलीज होत आहे. हा मराठी चित्रपट 'सैराट' चा हिंदी रीमेक आहे.
- अर्जुन सध्या लंडनमध्ये 'नमस्ते इंग्लंड' चित्रपटाची शूटिंग करत आहे. चित्रपटात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा आहे.

 

बातम्या आणखी आहेत...