आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक दिवसांनंतर बायको हेमा मालिनीसोबत स्पॉट झाले धर्मेंद्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : एव्हरग्रीन कपल... ही जोडी आजही तितकीच सुंदर दिसते. धर्मेंद्र आणि त्यांची पत्नी 'ड्रीम गर्ल'  हेमा मालिनी एकत्र दिसले. फॅन्ससाठी ही खुप आनंदाची गोष्ट होती. कारण दिर्घकाळानंतर हे दोघं एकत्र स्पॉट झाले. हे दोघं गेल्यावर्षी डायरेक्टर अनिल शर्माचा चित्रपट 'जीनिअस' च्यावेळी एकत्र दिसले होते. धर्मेंद्र 82 वर्षांचे आहेत आणि अजूनही चित्रपटात अॅक्टिव्ह आहेत. त्यांचा आगामी चित्रपट 'यमला, पगला दीवाना फिस से' हा चित्रपट याचवर्षी रिलीज होणार आहे. तर हेमा मालिनीकडे सध्या कोणत्याही चित्रपटाची ऑफर नाही. त्या शेवटच्यावेळी 'एक थी राणी ऐसी भी'(2017) मध्ये दिसल्या होत्या. त्या सध्या क्लासिकल डान्स स्टेज शोज करतात.

 

धर्मेंद्र तेव्हापासून आतापर्यंत
धर्मेंद्रच्या लुक्सविषयी क्रेज पहिल्यापासूनच आहे. ही क्रेज आताही कमी झालेली नाही. जया बच्चनने धर्मेंद्रला एकदा ग्रीक गॉड म्हणून बोलावले होते. ट्रेजिडी किंग दिलीप कुमार यांनी सांगितले होते की, मी पहिल्यांदा धर्मेंद्र यांना पाहिले होते तेव्हा पाहतच राहिलो होतो. 
- काही दिवसांपुर्वीच धर्मेंद्र यांनी मुलगा बॉबी देओल आणि सलमान खानचा चित्रपट 'रेस 3' चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांना आपला तरुणपणातील फोटो शेअर केला.

 

यावर फॅन्स म्हणाले... सर... मी तुमच्याप्रमाणे हँडसम असतो तर...
'आसमान महल' या चित्रपटाच्या प्रीमिअरमध्ये झाली हेमासोबत भेट
धर्मेंद्र आणि हेमा यांची पहिली भेट ख्वाजा अहमद अब्बासचा चित्रपट  'आसमान महल' च्या प्रीमिअरच्या वेळी 1965 मध्ये झाली होती. तोपर्यंत धर्मेंद्र इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार म्हणून सेटल झाले होते. तर हेमाने फक्त एका चित्रपटात (सपनो के सौदागर 1968) मध्ये काम केले होते. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. परंतू हे दोघं हळुहळू एकमेकांकडे आकर्षित झाले. 'शोले'(1975) चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी दोघांची जवळीक वाढली. 1980 मध्ये दोघांनी लग्न केले. त्यावेळी धर्मेंद्रचे लग्न झालेले होते. त्यांनी 1954 मध्ये प्रकाश कौरसोबत लग्न केले होते.

 

दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र केले काम
धर्मेंद्र-हेमा मालिनीने 'सीता और गीता' (1972), राजा जानी (1972), दोस्त (1974), 'शोले' (1975), 'चरस' (1976), 'ड्रीम गर्ल' (1977), 'चाचा भतीजा' (1977)  सोबतच अनेक चित्रपटात एकत्र काम केले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा धर्मेंद्र-हेमा मालिनीचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...