आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीया मिर्जाला बनवायचा आहे अमृता शेरगिलवर बायोपिक, 'संजू'च्या यशामुळे आनंदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : दीया मिर्जाने सांगितले की, घटनांवर आणि व्यक्ती यांच्या जीवनावर मी खुप प्रभावित आहे. दियाला वाटते की, देशात अनेक असे व्यक्ती आहेत, ज्यांना चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणले जाऊ शकते.  दीयाने सांगितले की, जर मी एखादा बायोपिक बनवला तर तो अमृता शेरगिलवर असेल. कारण त्या एक कलाकार होत्या.


- अमृता शेरगिलने भारतीय कलेला जगभरात ओळख मिळवून दिली. वयाच्या 28 व्या वर्षीच अमृता यांचे निधन झाले. अमृता यांना लहान मुलं खुप आवडायचे असे बोलले जाते.

 

संजय दत्तने दिली होती जिमची ऑफर
दीयाने सांगितले की, तिने संजय दत्तसोबत 5-6 चित्रपट केले आहेत. तिने सांगितले की, मान्यताच्या भूमिकेसाठी मला चेह-यावर फक्त तीळ लाववा लागला आणि केस डाय करावे लागले. यावेळी तिने संजयसोबतचा एक किस्सा शेअर केला. तिने सांगितले की, पहिल्यांदा मी त्यांच्यासोबत चित्रपटात काम करत होते, तेव्हा ते मला म्हणाले की, तु जिम कुठे करते, खुप फिट दिसतेय. यावर मी सांगितले की, एका मॉलमध्ये जिम करते. यावर संजय बोलला की, अशा अनोळखी ठिकाणी जिममध्ये जाण्याची गरज नाही. तु माझ्या घराच्या आउटहाउसमधील जिममध्ये येऊन वर्कआउट करत जा.

बातम्या आणखी आहेत...