आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार @95, यामुळे होऊ शकले नाही मधुबालासोबत लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुबाला आणि दिलीपकुमार. - Divya Marathi
मधुबाला आणि दिलीपकुमार.

चित्रपटसृष्टीची जिवंत दंतकथा म्हणून ख्याती असलेले दिलीपकुमार 95 वर्षांचे झाले आहेत. ट्रॅजेडी किंगच्या आयुष्यातील काही खास गोष्टी घेऊन आम्ही आलो आहोत. दिलीपकुमार यांनी सायरा बोना पत्नी असताना दुसरे लग्न केले होते. मात्र त्याही आधी त्यांचे जीवापाड प्रेम होते ते मधुबालावर. मात्र एवढ्या यशस्वी कलाकारालाही नकार मिळाला होता. मात्र तो मधुबाला यांच्याकडून नाही तर मधुबाला यांच्या वडिलांकडून. 

 

मधुबालावर होते जीवापाड प्रेम

- दिलीप कुमार यांचे मधुबालावर जीवापाड प्रेम होते. कामिनी कौशल यांच्यानंतर दिलीप साहेबांनी मधुबालाला आपल्या जोडिदाराच्या रुपात बघितले होते. मधुबालाबरोबर दिलीप साहेबांनी एकुण चार सिनेमांमध्ये एकत्र काम केले. 
- 'तराना', 'संगदिल', 'अमर' आणि 'मुगल-ए-आजम' या सिनेमांमध्ये दिलीप कुमार-मधुबाला ही जोडी झळकली होती.

- दोघांचे प्रेम बहरत असताना मधुबालाच्या वडिलांनी त्यांच्यात आडकाठी निर्माण केली. मधुबालाचे वडील अताउल्लाह खान यांना या दोघांचे नाते कबूल नव्हते. त्यामुळेच त्यांनी मधुबालाला दिलीप कुमार यांच्याबरोबर 'नया दौर' या सिनेमात काम करु दिले नाही.

- सिनेमा साईन करुन काम करण्यास नकार दिल्यामुळे निर्माता-दिग्दर्शक बी.आर.चोप्रा यांनी मधुबालावर खटला दाखल केला. हे प्रकरण न्यायालयात गेले.

- दिलीप साहेबांनी मधुबालाऐवजी बी.आर.चोप्रा यांना साथ दिली. त्यामुळे मधुबाला आणि दिलीप कुमार यांचे नाते संपुष्टात आले. 
- दिलीप साहेबांनी 1966 साली आपल्या वयापेक्षा 22 वर्षे लहान असलेल्या सायरा बानोबरोबर लग्न केले. 

 

दिलीप साहेबांबद्दलच्या आणखी FACTS जाणून घ्या पुढील स्लाइडवर...

बातम्या आणखी आहेत...