आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Twit: माझ्या कोहिनूरसाठी प्रार्थना करा, सायरा बानो यांचे भाविनक ट्वीट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: ट्रेजेडी किंग म्हटल्या जाणा-या दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा असे ट्वीट केले आहे. 29 जूनला सायरा एका वेडिंग फंक्शनमध्ये गेल्या होत्या. त्या पहिल्यांदा दिलीप कुमार यांच्याशिवाय एखाद्या फंक्शनमध्ये गेल्या. याचे कन्फेशनही त्यांनी दिलीप कुमार यांच्या ट्वीटर अकाउंटवर SBK सिग्चेरने केले आहे.

 

असे केले ट्वीट
सायरा यांनी ट्वीटमध्ये लिहिले की - "देवाची कृपा तुमच्यावर सदैव राहावी. माझ्या कोहिनूरच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करा. आम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला लक्षात ठेवतो, त्याच प्रमाणे आम्हाला प्रार्थनेत लक्षात ठेवा"
- सायराने दिलीपच्या ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, निदा फारुखीच्या निकाहमध्ये, परंतू ती फोटोमध्ये नाही.

 

गेल्या वर्षी खराब झाली होती दिलीप कुमार यांची तब्येत
94 वर्षांच्या दिलीप कुमार यांना 2 ऑगस्ट 2017 मध्ये डिहायड्रेशन आणि यूरिन इन्फेक्शनमुळे एक आठवडात लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दिलीप घरी आल्यानंतर बॉलिवूडचे अनेक सेलेब्स त्यांना भेटण्यासाठी घरी पोहोचले होते.
- शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राने दिलीप कुमार यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.


22 वर्षांनी लहान आहेत सायरा बानो
दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची लव्ह स्टोरी बॉलिवूडच्या आयकॉनिक लव्ह स्टोरीजमधून एक आहे. सायरा यांच्या हट्टामुळे दिलीप कुमार 22 वर्षे लहान सायरासोबत लग्न करण्यासाठी तयार झाले होते.
- 1966 मध्ये दोघांचे लग्न झाले. दिलीप कुमार यांनी 1981 मध्ये हैदराबादच्या असमासोबत दूसरे लग्न केले होते. परंतू असमासोबत 1983 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 
 
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...