आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्मामागील गोष्ट : श्रीदेवी आणि माधुरी एकाच चित्रपटात एकत्र आल्या होत्या, पण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी - Divya Marathi
फाइल फोटो - माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी

श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित एकाच चित्रपटात व त्याचे दिग्दर्शन रमेश सिप्पींकडे!

 

योग कसा वाटतोय?


1987 साली खरोखरंच तसा योग आला होता. त्यानुसार चित्रपटाच्या मुहूर्ताबरोबरच जोरदार पार्टीदेखील झाली. पण प्रत्यक्षात हा चित्रपट मध्येच बंद पडला. 


'सागर'च्या यशानंतर रमेश सिप्पी कोणत्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार, याबाबत चित्रपट रसिकांना प्रचंड उत्सुकता होती. मीडियासाठीही ही महत्त्वाची खबर होती. अशातच एक भव्य आमंत्रण पत्रिका हाती पडली. त्यात म्हटले होते, की रमेश सिप्पींचा नवा चित्रपट 'जमीन'च्या मुहूर्ताला या! कलाकार होते विनोद खन्ना, श्रीदेवी, माधुरी दीक्षित इत्यादी. चित्रपटाचा निर्माता कोणी तरी रमेश मल्होत्रा. पण मुहूर्ताचे ठिकाणे होते जुहू येथील एक पंचतारांकित हॉटेल. सगळा मामला तसा एकदम हायफाय.

 

माधुरीच्या तेव्हाच्या पोझिशनचीही थोडी कल्पना द्यायला हवी. हा काळ 'तेजाब' झळकण्यापूर्वीचा  होता आणि माधुरी तेव्हा आपल्या फ्लॉपच्या चक्रातून बाहेर पडण्याची धडपड करीत होती. त्याचाच एक भाग म्हणून मीनाक्षी शेषाद्री नायिका असणा-या स्वाती आणि आवारा बापमध्ये तिने चक्क दुय्यम भूमिका स्वीकारली होती नि तशीच तिने जमीनमध्येही श्रीदेवी नायिका असताना सहनायिकेची भूमिका स्वीकारली होती. करिअरचा खेळ-मेळ असा असतो बघा. 

 

अर्थात तेव्हा श्रीदेवी नंबर वनवर होती आणि मुहूर्ताच्या पार्टीच तीच केंद्रस्थानी असणे अगदी स्वाभाविक होते. पण माधुरी दीक्षित त्या पार्टीत कशी वावरत होती? वाचा पुढील स्लाईडवर... 

बातम्या आणखी आहेत...