आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच नाही श्रीदेवी-स्मिताचा \'नजराना\', वाचा नेमके काय घडले होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीदेवी आणि स्मिता पाटील... व्यक्तिमत्त्व, अभिनय, इमेज आणि चाहता वर्ग... सगळ्या बाबतीत भिन्न असणारी दोन रुपं... त्या एकदा चित्रपटातून एकत्र चमकल्या होत्या आणि ते दुर्लक्षित राहिलं होतं. हे त्या दोघींचं तसंच रसिकांचंही दुर्दैव! तो चित्रपट होता रवी टंडन दिग्दर्शित 'नजराना' (1987)! हे रवी टंडन, म्हणजे, रवीना टंडनचे पिता! त्यांनी अनहोनी, मजबूर, खेल खेल में, झूटा कही का, खुद्दार, जिंदगी, या चित्रपटांतून रसिकांच्या एका पिढीला भरपूर आनंद दिला होता. निर्माते सी.व्ही.के. शास्त्री आणि जुदाह सालेमन यांनी टंडन यांना दिग्दर्शनाची संधी देताच त्यांनी राजेश खन्नासह या दोघींना निवडून नजरानाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. जोडीला प्रीती सप्रू, गीता टाक, जयश्री गडकर, दलीप ताहिल, शफी इनामदार हे कलाकार होते. त्या दिवसांत राजेशची प्रीती आणि शफी यांच्यावर खास मर्जी असल्याने ते त्याच्या सेटवर हमखास रेंगाळताना दिसत. हेदेखील या ग्लॅमर इंडस्ट्रीचे एक अंग. 

 

स्मिता-श्रीदेवी अशा अत्यंत दुर्मिळ योग पत्रकार म्हणून कव्हर करणं गरजेचं होतं. सिनेमाच्या क्षेत्रात प्रसिद्धीसाठी अधिकाधिक संधी निर्माण करण्याची सवय सहजच लागून जाते. अशातच ट्रॉम्बे इथल्या एस्सेल स्टुडिओत कोर्टाच्या सेटवर राजेश-स्मिता-श्रीदेवी असेही तिघेही असताना मीडियाला खास बोलावण्यात आले. यात विशेष ते काय? त्या दिवसांत शूटिंग कव्हरेज म्हणजे प्रामुख्याने सेटवर काय-काय चाललंय, याचा 'आँखो देखाल हाल मांडण', वाचकांसमोर सेटवरचा 'फिल' नेणं. प्रत्यक्षात सेटवर स्मिता आणि श्रीदेवीमधले काही नाट्यमय प्रसंग चित्रीत होत असताना तिथला अनाकलनीय तणाव शब्दांत सांगणं कठीण होतं. 


पुढे वाचा, सेटवर कसा असायचा श्रीदेवी आणि स्मिता पाटील यांचा वावर... 

बातम्या आणखी आहेत...