आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Diljit Dosanjh Used To Travel In Private Jet: Diljit's Wife Sandeep Kaur Lives In America With Son

'Soorma' प्रायवेट जेटने प्रवास करतो दिलजीत दोसांझ, वैवाहिक आयुष्यात वादामुळे पत्नी-मुलगा राहतो दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: हॉकी प्लेअर संदीप सिंह यांच्या 'सूरमा' बायोपिकमध्ये दिलजीत दोसांझ त्यांची भूमिका साकारत आहे. दिलजीत दोसांझ हे पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिध्द नाव आहे. उडता पंजाब, फिल्लौरी आणि वेलकम टू न्यूयॉर्कनंतर हा त्याचा चौथा बॉलिवूड चित्रपट आहे. गेल्यावर्षी त्याचे प्रायवेट जेट खुप चर्चेत राहिले होते. दिलजीत दोसांजने ट्वीटवर त्याच्या प्रायवेट जेट असल्याचे सांगितले होते. त्याच्या स्वतःच्या 2 क्लोदिंग लाइन्स आहेत. दिलजीतला लोक प्रेमाने पंजाबी सिनेमचाचा 'शाहरुख खान' म्हणतात.

 

वादांमध्ये आहे वैवाहिक आयुष्य 
- दिलजीतच्या वैवाहिक आयुष्याविषयी खुप कमी लोकांना माहिती असेल. तो कधीच आपल्या पत्नीला मीडियासमोर घेऊन आलेला नाही. परंतू नवरा-बायकोमध्ये चांगले संबंध नाही. रिपोर्टनुसार दोघांचे बोलणेही बंद आहे. 
- दीलजीतच्या पत्नीचे नाव संदीप कौर आहे, ती मुलासोबत अमेरिकेत राहते. संदीप कौरचा एखादा फोटोही उपलब्ध नाही.


चित्रपटांसाठी पगडी काढणार नाही
- दिलजीतने एका मुलाखतीत सांगितले होते की, बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याच्यासाठी जास्त काम नाही. कारण फिल्म मेकर्सला हिरोला नेहमी एकाच लूकमध्ये पाहणे पसंत नसते. पण तो कोणत्याही बॉलिवूड चित्रपटासाठी आपली पगडी काढण्यास तयार नाही. 
- पंजाबी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये यासाठी काहीच बंधन नाही. यामुळे तो बॉलिवूडपेक्षा जास्त पंजाबी चित्रपट करणार आहे.


2009 मध्ये झाली करिअरची सुरुवात
त्याचे वडील पंजाब रोडवेजचे रिटायर कर्मचारी आहेत. आई हाउसवाइफ आहे. परंतू आज दिलजीत पंजाबचा सुपरस्टार बनला आहे. दिलजीतने 2009 मध्ये रॅपर हनी सिंहसोबत 'गोलियां' गाणे गायले होते. याच्या जुगलबंदीने त्याला इंटरनॅशनल स्टार बनवले होते. 
- यानंतर हनी सिंहसोबत दिलजीतचा 'पंगा' आला होता. हा सुपरहिट ठरला. IMDB ने त्याला 2016 मध्ये पंजाबी अॅक्टर्समध्ये टॉप स्थान दिले होते.

 

असे आहे फिल्मी करिअर 
2011 मध्ये दिलजीतचा पंजाबी चित्रपट 'द लॉयन ऑफ पंजाब' आणि त्यानंतर 'जिन्ने मेरा दिल लुटया' रिलीज झाला. परंतू  'जट्ट एंड जूलियट' या चित्रपटातून त्याला पंजाब आणि संपुर्ण देशात ओळख मिळाली.
- दिलजीतने आतापर्यंत 'साड्डी लव स्टोरी', 'डिस्को', 'पंजाब-1984', 'सरदारजी', 'मुख्तियार चड्ढा', 'अंबरसिरया', 'सरदारजी-2', 'सुपर सिहं', 'सज्जन सिंह रंगरूट' नावाच्या पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...