आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेते आणि दिग्दर्शक लेख टंडन यांचा वाढदिवस, पहिलाच चित्रपट पोहोचला होता ऑस्करपर्यंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रसिध्द अभिनेते आणि सिनेदिग्दर्शक लेख टंडन यांचा वाढदिवस आहे. 13 फेब्रुवारी 1929 मध्ये जन्मलेल्या लेख टंडन यांना चित्रपट चित्रपटसृष्टीत येण्यासाठी पृथ्वीराज कपूर यांनी प्रेरित केले होते. पृथ्वीराज कपूर हे त्यांच्या वडिलांचे मित्र होते. शाहरुख खानला त्यांनी दिल दरिया या मालिकेत सर्वप्रथम संधी दिली होती. फरमान या टीव्ही सीरियलचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. आम्रपाली या चित्रपटातून लेख टंडन यांनी आपल्या दिग्दर्शनाची सुरुवात केली होती. या चित्रपटात वैजयंती माला व सुनील दत्त लीड रोलमध्ये होते. आपल्या या पहिल्याच चित्रपटाद्वारे ते ऑस्करपर्यंत पोहोचले होते. लेख टंडन यांचा 'आम्रपाली' हा चित्रपट भारताकडून 39 व्या ऑस्कर अवॉर्डसाठी पाठवण्यात आला होता. लेख टंडन यांचे 16 ऑक्टोबर 2017 रोजी निधन झाले.

 

लेख टंडन यांचे गाजलेले चित्रपट
उत्तरायण, आम्रपाली, प्रोफेसर, झुक गया आसमान, जहा प्यार मिले, आंदोलन, दुल्हन व्ही जो पिया मन भाये, शारदा, एक बार कहो, अगर तुम ना होते, दुसरी दुल्हन, मिल गयी मंजिल मुझे त्यांचे हे चित्रपट गाजले. त्याचा जन्म 13 फेब्रवारी 1929 रोजी लाहोर येथे झाला होता. त्यांना चित्रपटसृष्टीत येण्यासाठी पृथ्वीराज कपूर यांनी प्रेरित केले होते. पृथ्वीराज कपूर हे त्यांच्या वडिलांचे मित्र होते. शाहरुख खानला त्यांनी दिल दरिया या मालिकेत सर्वप्रथम संधी दिली होती. फरमान या टीव्ही सीरियलचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.

 

संदर्भ : अशोक उजळंबकर


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा लेख टंडन यांचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...