आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्या भारतीच्या आईचे निधन, अखेरच्या काळात शरीरातून गळू लागले होते पाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीची आई मीता भारती यांचे आठवड्याभरापूर्वीच निधन झाल्याचे वृत्त आहे. दिव्याची आतेबहीण कायनात अरोराने ही बातमी दिली. DainikBhaskar.com सोबत बोलताना कायनात म्हणाली, "मीता मामी आता आपल्यात नाहीत. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या आणि अखेरच्या काळात त्यांच्या शरीरातून पाणी गळू  लागले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या शुक्रवारी आम्ही त्यांना नित्य तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन गेलो होतो. तेथेच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला." 


दोन दिवसांपूर्वी झाली शोकसभा...
- मीता भारती यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दोन दिवसांपूर्वी मुंबईतील आर्य समाज मंदिरात शोक सभा ठेवण्यात आली होती. मामी मीता भारती यांच्या आठवणींना उजाळा देताना कायनात म्हणाली, "आम्ही दीर्घ काळ एकत्र घालवला आहे. त्या आमची अतिशय काळजी घ्यायच्या. मी कुठे बिझी आहे, माझे करिअर कसे सुरु आहे, याची त्या नेहमी चौकशी करायच्या. आमच्या बोलण्यात दिव्या (दिव्या भारती) दीदीचा उल्लेख हमखास निघायचा. दिव्या दीदींकडे त्याकाळात व्हॅनिटी व्हॅन नव्हती. त्यामुळे ती तिच्या कारमध्ये बसून मेकअप करायची. त्यावेळी मीता मामी तिच्यासोबत असायच्या त्यांनी कायम दिव्या दीदीला पाठिंबा दिला. त्या दीदीशी एवढ्या अटॅच होत्या, की कधीच तिला विसरु शकल्या नाहीत. तिच्या जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यातून त्या कधीच स्वतःला सावरु शकल्या नाहीत. आता त्या दिव्या दीदीकडे कायमच्या निघून गेल्या."

 

पुढे वाचा, आणखी काय सांगितले अभिनेत्री कायनात अरोराने...

 

बातम्या आणखी आहेत...