आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Magzine वर ब्रेस्टफिडिंग करताना झळकली ही अॅक्ट्रेस, दिव्यांका म्हणाली- आपल्या बाळाला दूध पाजणे अश्लील नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'गृहलक्ष्मी'  या मल्याळम मॅगझिनच्या कव्हर पजेवरुन निर्माण झालेल्या वादावर टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिने तिचे मत व्यक्त केले आहे. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर प्रसिद्ध साऊथ मॉडेल गिलू जोसेफ तिच्या बाळाला ब्रेस्टफिडींग करताना दिसत आहे. यावरुन गिलूवर टीकेची झोड उठली असून काहींनी हे शूट अश्लील असल्याचे म्हटले आहे. यावर दिव्यांकाने गिलूला पाठिंबा दर्शवला आहे. सोबतच गिलूवर टीका करणा-यांना सडेतोड उत्तर दिले आहे. 


दिव्यांका म्हणाली, ब्रेस्टफीडिंग अश्लीलता नाही... 
- दिव्यांकाने एका एंटरटेन्मेंट साइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, "मी केरळ हायकोर्टाच्या निर्णयाचा आदर करते आणि या निर्णयाविषयी कोर्टाचे आभार व्यक्त करते. मी गृहलक्ष्मी आणि गिलू जोसेफ यांचे कौतुक करते. हे एक बोल्ड आणि अतिशय आवश्यक असे पाऊल आहे."
- "एक आई, एक आई असते. जर ती तिच्या भुकेने व्याकूळ बाळाला दुध पाजते तर त्यात अश्लील असे काहीच नाही. एक आई तिच्या बाळाची इच्छा पूर्ण करतेय आणि सर्वच स्त्रियांना ब्रेस्टफीडिंग करताना लाज बाळगायची गरज नाही."
- "मी माझ्या अनेक मैत्रिणी आणि नातेवाईकाना सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या बाळांना दूध पाजताना चितिंत झालेले पाहिले आहे. आपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना त्यांच्या बाळांना स्तनपान देण्यासाठीची काहीच सोय नाही.''

 

एका वकिलाने उठवला होता ब्रेस्टफीडवर प्रश्न...  
- मॅगझिनच्या कव्हर पेजवर ब्रेस्टफीड करताना दिसणा-या मॉडेलच्या छायाचित्रावर विनोद मॅथ्यू विल्सन नावाच्या एका वकिलाने प्रश्न उपस्थित कले होते. त्याच्या मते, असे उघडपणे स्तनपान देणे हे अश्लील आणि अपमानजनक आहे. यामुळे महिलांची प्रतीमा मलिन होत असल्याचे सांगून मॅथ्यूने कोर्टात एक याजिका दाखल केली होती. पण केरळ हायकोर्टाने मॅगझिनच्या बाजुने निर्णय दिला. 
- कोर्टाने म्हटले, "या कव्हर पेजवर काहीही अश्लील नाही. अश्लीलता ही बघणा-याच्या डोळ्यांत असते."  या कव्हर पेजची टॅगलाइन आहे, "केरळच्या आया म्हणत आहे, कृपया न्याहाळू नका, आम्हाला ब्रेस्टफीड करायचे आहे."  

बातम्या आणखी आहेत...