आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाच्या मालिकेमुळे दुबईतील 5 स्टार हॉटेलच्या शेफला नोकरीवरुन काढले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- 'क्वांटिको' च्या एका एपिसोडने सुरु झाला वाद
- यामध्ये हिंदूंना आतंकवादी दाखवण्यात आले.
- वाद झाल्यावर प्रियांकाने मागितली माफी


मुंबई : प्रियांका चोप्राचा 'क्वांटिको' शो एका एपिसोडमुळे वादात अडकला आहे. हा वाद अजूनही सुरु आहे. यामुळेच भारतात प्रियांकाला ट्रोल करण्यात आले होते. आता दुबईच्या 5 स्टार हॉटेलमध्ये शेफ म्हणून नोकरी करणा-या भारतीय व्यक्तीला नोकरीवरुन काढण्यात आले आहे. क्वांटिकोच्या एका एपिसोडमध्ये काही हिंदुंना आतंकवादी दाखवत बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्लान बनवताना दाखवण्यात आले होते. यानंतर भारतीय यूजर्सने प्रियांकाला ट्रोल करणे सुरु केले होते. यानंतर तिला पब्लिकली माफी मागावी लागली होती. 


हा वाद येथेच थांबला नाही. क्वाटिंकोचा हा एपिसोड पाहून दुबईमध्ये राहणा-या भारतीय शेफ अतुल कोचरनेही ट्वीट केले. त्यांनी लिहिले होते की, - तुम्ही त्या हिंदुंच्या भावनांची किंमत केली नाही, जे गेल्या 2 हजार वर्षांपासून इस्लाम व्दारे आतंकित केले जात आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. कोचरच्या या ट्वीटनंतर लोकांनी अनेक रिअॅक्शन दिल्या. काहींनी त्यांना इतिहासाचे उदाहरण दिले तर काहींनी त्यांना इस्लामोफोबिक म्हटले. हा वाद वाढत जातोय हे पाहून अतुलने आपले ट्वीट डिलीट केले.


कोचरने माफी मागितली पण नोकरी गमवावीच लागली 
प्रसिध्द मिशेलिन शेफ अतुल कोचर दुबईमध्ये JW मेरियट हॉटेलच्या रंगमहल रेस्तरॉमध्ये काम करायचा. कोचने आपल्या ट्वीटसाठी माफी मागत लिहिले - मी माझ्या चुकीसाठी माफी मागतो, मी त्या दिवशी विचार न करता ट्वीट केले होते. मला माहिती आहे की, इस्लामची स्थापना 1400 वर्षांपुर्वी झाली होती आणि मी इस्लामोफोबिक नाही. माझ्या ट्वीटमुळे ज्या लोकांच्या भावना दुखावल्या. त्यांची मी माफी मागतो. तरीही त्यांना नोकरीवरुन काढण्यात आले. हॉटेलचे जनरल मॅनेजर बिल कॅफेरने सांगितले की, अतुल कोचरच्या कमेंट्सनंतर आम्ही त्यांच्यासोबतचे सर्व अॅग्रीमेंट संपवत आहोत. आता अतुल कोणत्याही रेस्तरॉशी जोडलेले राहणार नाहीत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत एखाद्या कम्युनिटीविषयी वाईट गोष्टी सहन करु शकत नाही.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा अतुल कोचरने केलेले ट्वीट...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...