आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर बोलून फसली एकता कपूर, सोशल मीडियावर उडवली खिल्ली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : पेट्रोल आणि डीजेलच्या वाढलेल्या किंमतींमुळे सध्या देशभरात वाद सुरु आहे. याच काळात प्रसिध्द सीरियल मेकर एकता कपूरने पेट्रोल-डीजेलच्या किंमतींवर एक व्यक्तव्य केलेय. यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जातेय. 'वीरे दि वेडिंग' च्या म्यूझिक लॉन्चवर एकताला पेट्रोलच्या वाढत्या किंमतींवर प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा   ती म्हणाली - पेट्रोलच्या किंमती कितीही वाढल्या, तरी पुरुष महिलांना ड्राइव्हवर घेऊन जातील. आजच्या समयी महिलासुध्दा पुरुषांना लाँग ड्राइव्हवर घेऊन जाणार आहेत. हा असा चित्रपट नाही की, जो तुम्ही पाहणे बंद कराल. यामुळे तुम्ही ड्राइव्हिंगवर कमी आणि थिएटरवर जास्त पैसे खर्च करायला हवेत.


'स्टेजवर येण्यापुर्वी पेट्रोल प्यायले होते का?'
एकताच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडिया यूजर्स तिची खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने लिहिले की, एकता कपूरने स्टेजवर येण्यापुर्ऴी पेट्रोल प्यायले होते का? तर एका यूजरने लिहिले - तिचे लॉजिकसुध्दा तिच्या सीरियरप्रमाणे आहे... बेसमेंट लेव्हल. तर एका यूजरने लिहिले - असे वाटतेय की, मॅडमला एखाद्याने मिरिंडा म्हणून पेट्रोल पाजले आहे. 


- सध्या पेट्रेल-डिजेलच्या किंमती वाढलेल्या आहेत. गेल्या 9 दिवसांमध्ये पेट्रोलच्या किंमती 2.24 रुपयांनी वाढल्या आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोल 77 रुपये झाले आहे तर मुंबईमध्ये याच्या किंमती 84 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचल्या आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, पेट्रोलच्या किंमतीवर एकता कपूरची उडवली जातेय खिल्ली...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...