आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hema Malini Handling Granddaughter Radhya And Esha Deol Spending Time With Husband Bharat In Holiday

Photo: कुटूंबासोबत अमेरिकेत एन्जॉय करतेय ईशा देओल, शेअर केले फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : ईशा देओल सध्या पती भरत तख्तानी, मुलगी राध्या आणि हेमा मालिनीसोबत कॅलिफॉर्नियामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. ईशाने सोशल मीडियावर व्हॅकेशनचे काही फोटोज शेअर केले आहे. फोटोमध्ये ती मुलीसोबत लंच एन्जॉय करताना दिसतेय. विशेष म्हणजे शॅम्पेन पाहून ईशा आणि तिच्या मुलीच्या चेह-यावर स्माइल आलेली आपल्याला पहायला मिळतेय.


आजी सांभाळतेय राध्याची जबाबदारी
- ईशा ही एकापाठोपाठ एक पतीसोबतचे व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे फोटोज शेअर करतेय. तिने एक फोटोच्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, नानी म्हणजेच हेमा मालिनी सध्या नात राध्याची जबाबदारी सांभाळत आहेत.
- ईशाने आई हेमासोबतचे फोटोही शेअर केले होते. तिने सांगितले होते की, हॉलिडेसाठी ते एका अपार्टमेंटमध्ये थांबले आहेत. येथे स्वतःच जेवण बनवावे लागले आणि भांडी घासावी लागतात.
2012 मध्ये ईशाने केले होते लग्न
- ईशा देओलने 29 जून, 2012 रोजी बांद्रा येथील बिझनेसमन भरत तख्तानीसोबत मुंबईच्या इस्कॉन मंदिरात लग्न केले होते.
- या कपलला 8 महिन्यांची मुलगी आहे. तिचे नाव राध्या आहे. राध्या ही हुबेहुब आईसारखी दिसते. राध्याचा जन्म 23 ऑक्टोबर, 2017 मध्ये झाला होता.
- ईशाला 2002 मध्ये आलेल्या 'कोई मेरे दिल से पूछे' या चित्रपटासाठी बेस्ट डेब्यू अवॉर्ड देण्यात आला होता. परंतू यानंतर तिचे करिअर जास्त काळ टिकले नाही. 

बातम्या आणखी आहेत...