आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर काळाच्या पडद्याआड, दीर्घ आजाराने पुण्यात निधन Veteran Marathi Theatre And Film Director Dilip Kolhatkar Passes Away

ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर काळाच्या पडद्याआड, दीर्घ आजाराने पुण्यात निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यात निधन झाले. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून आजारी होती. त्यांच्या पाश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांची ‘कवडी चुंबक’, ‘राजाचा खेळ’, ‘मोरूची मावशी’, ‘उघडले स्वर्गाचे दार’,  ही नाटकं विशेष गाजली होती. आपल्या दिग्दर्शनातून त्यांनी नाटकांमध्ये कायमच स्वत:ची छाप सोडली. 

 

कोल्हटकरांनी प्रायोगिक नाटकांमधून नेपथ्थकार म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर ते हळूहळू दिग्दर्शनाकडे वळाले होते.. प्रायोगिक नाटकानंतर त्यांनी बऱ्याच व्यावसायिक नाटकांमध्ये नेपथ्थ, प्रकाशयोजना आणि दिग्दर्शक अशा भूमिका पार पाडल्या. कोल्हटकरांनी विजया मेहता यांच्या नाटकांचंही नेपथ्य आणि प्रकाश योजना केली होती.

 

 

फेब्रुवारी महिन्यात पत्नीचाही झाला होता मृत्यू
दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली यांचा फेब्रुवारी महिन्यात संशयास्पद मृत्यू झाला होता. दिलीप कोल्हटकर हे अंथरुणाला खिळून होते. त्यांच्या वयोवृद्ध सासूबाई घरात असायच्या. अशा वेळी किचनमध्ये जळालेल्या अवस्थेत दीपाली यांचा मृतदेह आढळला होता. त्यांच्या नोकरानेच त्यांची हत्या केली असे समोर आले होते. 

बातम्या आणखी आहेत...