आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोलक्या डोळ्यांची मालकीन श्रीदेवी, जिने पुरुषप्रधान बॉलिवुडवर 5 दशक गाजवले राज्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवुडची पहिली महिला सुपर स्टार अशी ओळख असलेली चुलबुल अभिनेत्री श्रीदेवीने शनिवारी रात्री अचानक जगाचा निरोप घेऊन सर्वांना धक्का दिला. दुबईत एका कौटुंबिक लग्न समारंभात गेली असताना तिला हृदयविकाराचा झटका बसला. श्रीदेवी बद्दल म्हटले जाते, की खरोखर तिचे डोळे बोलत होते. गूढ स्मितहास्य आणि बोलक्या डोळ्यांची मालकीन असलेल्या या सुपरस्टारने बॉलिवुडमध्ये प्रवेश घेतला तेव्हा पुरुष अभिनेत्यांचाच दबदबा होता. श्रीदेवीच्या आगमनानंतरच 80 आणि 90 च्या दशकात बॉलिवुडला पहिली महिला सुपरस्टार मिळाली. पुढची 5 दशके तिने बॉलिवुड आणि करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केले.

 

श्रीदेवीने बदलला ट्रेंड
- श्रीदेवीने मेल डॉमिनेटेड हिंदी चित्रपट सृष्टीतील ट्रेंड बदलला. कित्येक वेळा ती चित्रपटात असल्याने चित्रपट हिट होतो असे गणित जुळले होते. 
- रिअल लाइफमध्ये ती अतिशय लाजाळू होती. पण, पडद्यावर तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. लोक तिचा स्टाइल आणि डान्सिंग स्टेप्सपासून सर्व काही कॉपी करायला लागले होते. मिस्टर इंडिया चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर तिला मिस हवा-हवाई असे नाव पडले होते. 
- श्रीदेवीला पहिला रोल वयाच्या चौथ्या वर्षी मिळाला. एमए थिरुमुगम यांच्या थुनाईवन चित्रपटात तिने पहिल्यांदा काम केले. तिने तमिळ, तेलुगु, मल्याळण आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले. 

बातम्या आणखी आहेत...