आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरुष्काच्या रिसेप्शनसाठी हॉटेलने हायर केले बाउंसर्स, एन्ट्री-एग्झिटवर होणार डबल चेकिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः  21 डिसेंबर रोजी दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये झालेल्या वेडिंग रिसेप्शननंतर आज (26 डिसेंबर) मुंबईत अनुष्का आणि विराट यांचे आणखी एक रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. मुंबईतील लोअर परेल स्थित हॉटल सेंट रेजिसमध्ये ग्रॅण्ड फंक्शन होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रिसेप्शनसाठी 40 मजली हायराइज हॉटेल सेंट रेजिसच्या 8th आणि 9th फ्लोअरवरील 'एस्टर बालरूम' बुक करण्यात आले आहे. याशिवाय पाहुण्यांसाठी काही रुमदेखील बुक करण्यात आल्या आहेत. रात्री 8.30 वाजता पार्टीला सुरुवात होणार असून मध्यरात्री तीन वाजेपर्यंत ही पार्टी रंगणार आहे. 

 

हॉटेलने वाढवली सुरक्षा व्यवस्या, हायर केले बाउंसर्स...
सूत्रांच्या माहितीनुसार, हे हॉटेलमध्ये हाय प्रोफाइल पार्टी होत असतात. आता या ठिकाणी अनुष्का आणि विराट यांचे रिसेप्शन होणार आहे म्हटल्यावर हॉटेलच्या प्रत्येक एन्ट्री एग्झिटवर डबल चेकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या कपलचा खासगी सिक्युरिटी स्टाफ आहे. पण तरीदेखील हॉटेलने एका खासगी सिक्युरिटी फर्मकडून एक्स्ट्रा बाउंसर्स हायर केले आहे. सुरक्षा व्यवस्था चोख असावी, यासाठी हॉटेलने ही खबरदारी घेतली आहे.  


साध्या कपड्यांत असेल सिक्युरीट..  
सिक्युरिटी अतिशय साध्या कपड्यांत असणार आहे. हॉटेलमध्ये दोन एन्ट्री पॉइंट्स आहेत. पण गेस्टसाठी एकच एन्ट्री ठेवण्यात आली आहे. याशिवाय मीडियासाठी रेड कार्पेट टाकण्यात आले आहे. येथे अनुष्का-विराटचे फोटोज क्लिक करण्याची व्यवस्था असणार आहे. हॉटेलमधील एक मोठा भाग हा कार पार्किंगसाठी असणार आहे. येथे 200 कार पार्क करण्याची व्यवस्था आहे.  

 

बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील मान्यवर लावणार उपस्थिती... 
रिसेप्शनमध्ये बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील मान्यवर उपस्थिती लावणार आहे. या यादीत शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, दीपिका पदुकोण, आलिया भट, कतरिना कैफ, रणबीर कपूर, रणवीर सिंह, शाहिद कपूर, वरुण धवन, राणी मुखर्जी, आदित्य चोप्रासह अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे.

 

तर विराटने इंडियन क्रिकेट टीमसह सचिन तेंडुलकर, जहीर खान आणि युवराज सिंह यांना आमंत्रित केले आहे. शिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस,  शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, एनसीपी सुप्रीमो शरद पवार, मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी हे देखील रिसेप्शनला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, हॉटेलच्या 38th फ्लोअरवर नाइटक्लब आहे, जे इंडियन क्रिकेट टीमसाठी बुक करण्यात आले आहे. येथे उशिरा रात्रीपर्यंत सेलिब्रेशन सुरु राहणार आहे.

 

ब्लू लहेंग्यात दिसणार अनुष्का...  
मुंबईत होत असलेल्या रिसेप्शनसाठी अनुष्काने सब्ससाची कलेक्शनमधील ब्लू कलरच्या लहेंग्याची निवड केली आहे.  

 

पुढे बघा, आलिशान हॉटेलचे इनसाइड फोटोज आणि वाचा काय आहे हॉटेलचे वैशिष्ट्य...  

बातम्या आणखी आहेत...