आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी पाणी पिऊन दिवस काढले, आज घराघरात ओळखला जातो हा 3 फुटचा हिरो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'झिरो' हा शाहरुख खानचा आगामी चित्रपट आहे. यामध्ये तो बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारत आहे. परंतू बॉलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत जे रियल लाइफमध्येही बुटके आहेत. परंतू तरीही त्यांनी आपली ओळख बनवली आहे. केके गोस्वामी यामधूनच एक आहेत. त्याने अनेक चित्रपट आणि टीव्ही सीरियल्समध्ये काम केलेय. त्याची हाइट फक्त 3 फूट आहे. लोकांनी उडवली खिल्ली...


अशी आहे संघर्ष कथा
केके अॅक्टर बनण्यासाठी मुंबईमध्ये आला होता. परंतू त्याला स्क्रीनपर्यंत पोहोचण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागली. एकदा त्याला त्यांच्या सारखी हाइट असणा-या व्यक्तीने बियर बारमध्ये नोकरी करण्याची संधी दिली. तो बियर बारमध्ये गेला तर वॉचमनने त्याला डंडा मारुन पळवून लावले. याच क्षणाला केकेने अॅक्टर बनण्याचे ठरवले. स्ट्रगलच्या काळात केके आठवड्यातून फक्त एक दिवस जेवण करत होता आणि इतर 6 दिवस पाणी पिऊन झोपत होता. पैशांची तंगी असूनही त्याने हार मानली नाही आणि शेवटी त्याला यश मिळाले. त्याला 'शक्तिमान' ही टिव्ही सीरियल करण्याची संधी मिळाली. हा शो हिट झाला आणि केकेला ओळख मिळाली.

 

टीआरपी वाढवण्यासाठी घेतात शोमध्ये
केकेने सांगितले की, जास्तीत जास्त प्रोड्यूसर त्यांच्या शोची टीआरपी वाढवण्यासाठी आमच्या सारख्या कमी हाइटच्या लोकांना घेत होते. परंतू आता असे नाही. आता आमच्या हाइटच्या लोकांनाही शोजमध्ये प्रमुख भूमिका दिली जाते. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती तरेव्हा मुलीकडील लोकांना त्याला पाहून नकार दिला होता. परंतू पिंकूची (बायको) जिद्द होती की, मला त्याच्यासोबतच लग्न करायचे आहे आणि असेच झाले. आता आम्हाला दोन मुलं आहेत. दोगांची हाइट चांगली आहे. केकेच्या वाइफ पिंकूची हाइट 5 फूट आहे.

 

अनेक चित्रपटात केलेय काम
- गोस्वामी बिहार मुजफ्फरपुर जिल्ह्यातील राहणारा आहे. चित्रपटात येण्यापुर्वी तो गावात स्टूडिओ चालवत होता.
- नंतर छोट्या-छोट्या भूमिका भोजपुरी चित्रपटात केल्या. आतापर्यंत त्याने 250 चित्रपटात काम केलेय.
- गोस्वामीने अनेक प्रसिध्द सीरियल्समध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तो लहानमुलांमध्ये खुप प्रसिध्द आहे.
- सध्या तो मुंबईमध्ये आपली दोन मुलं आणि पत्नीसोबत राहतो.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन बघा केके गोस्वामीचे काही फोटोज...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...