आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षे झाली चित्रपटांपासून आहे दूर, कधी काळी सेटवर या अॅक्टरची केली होती धुलाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फराह नाज आणि चंकी पांडे. - Divya Marathi
फराह नाज आणि चंकी पांडे.

फराह नाज 49 वर्षांची झाली आहे. फराहचा 9 डिसेंबर 1968 रोजी हैदराबादमध्ये जन्म झाला होता. 80च्या दशकातील या अॅक्ट्रेसची लाइफ कॉन्ट्रोवर्शियल राहिली आहे. गेल्या 12 वर्षांपासून फराह रुपेरी पडद्यापासून दूर आहे. फराह शॉर्ट टेम्पर्ड आणि अॅग्रेसिव्ह अॅक्ट्रेस मानली जाते. तिने एकदा फिल्मच्या सेटवरच चंकी पांडेची यथेच्छ धुलाई केली होती. 

 

- फराहच्या निशाण्यावर केव्हा कोण येईल हे सांगणे अवघड आहे. 'कसम वर्दी की' (1989) च्या सेटवर तिने अॅक्टर चंकी पांडेला बेदम चोप दिला होता. या घटनेची बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा झाली होती. चंकी पांडे सेटवर नेहमीच 'आय अॅम द मॅन' असे म्हणत अभद्र इशार करत असायचा, त्यामुळे त्याला वूमन पॉवर काय असते हे दाखवून दिले, असे फराह म्हणाली होती. फराहने वेळोवेळी असे धडे अनेकांना दिले आहेत. यानंतर फराह आणि चंकी यांच्यात मैत्री होऊ शकली नाही. 

 

जीवे मारण्याची दिली होती धमकी 
- या घटनेनंतर काही दिवसांनी फराहने एका मॅगजिनला मुलाखत दिली होती. 
- या मुलाखतीत जेव्हा चंकीचा उल्लेख आला तेव्हा फराह भडकली आणि तिने चंकीला थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती. 
- या मुलाखतीने इंडस्ट्रीमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. 
- फराहने 1985 मध्ये फासले चित्रपटापासून सुरुवात केली होती. तिचा शेवटचा चित्रपट 2005 मध्ये (शिखर) प्रदर्शित झाला होता. 

 

शबाना आझमीची नातेवाईक आहे फराह 
- नात्याने शबाना आझमी या फराहच्या मावशी आहेत. तब्बू ही फराहची लहान बहीण आहे. 
- फराहचे कौटुंबिक वातावरण हे शैक्षणिक राहिले आहे. तिची आई शाळेत टिचर होती, तर आजोबा प्रोफेसर  आजी लेक्चरर होत्या. फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याचे फराहचे कोणतेच प्रयोजन नव्हते. 

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा,

- दारा सिंगांची सून होती फराह...

- यश चोप्रांच्या पत्नीबद्दल बोलली भले-बुरे... 

- अनिल कपूरला यामुळे पब्लिकली सुनावले... 

बातम्या आणखी आहेत...