आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल-डिजेलच्या वाढत्या किंमतींवर अक्षयचे मौन, परंतू मोकळेपणाने बोलला फरहान अख्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : पेट्रोल डिजेलच्या किंमतींविषयी यूपीए सरकारमध्ये बोलणे आणि आता मौन बाळगण्या प्रकरणी अक्षय वादात आहे. याच काळात फरहान अख्तरने याविषयी त्याचे मदत मोकळेपणाने मांडले आहे. फरहान अख्तरने ट्वीट केले. फरहानने लिहिले की, तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या लोकांना 84 रुपये प्रती लिटर पेट्रोलच्या शुभेच्छा. पेट्रोलच्या   ख-या किंमतीची जी माहिती मला मिळाली ती 31 रुपये आहे. बाकीची किंमत केंद्र आणि राज्य सरकारचे टॅक्स आणि कमीशन आहे. फरहान अख्तरसोबतच काही सेलेब्सनेही पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

वाढत्या किंमती एक मोठी समस्या आहे - सोनू सूद
'आपल्याला नेहमी वाटायचे की, पेट्रोल-डिजेलच्या किंमती कमी होतील. पेट्रोल-डिजेलच्या किंमतींनेच आपल्या आर्थिक गोष्टी आणि वस्तूंच्या किंमतीवर प्रभाव पडतो'. हे जोपर्यंत वाढत राहिल तोपर्यंत प्रत्येक वस्तूची किंमत वाढत राहिल. जर सरकारला महागाईवर नियंत्रण मिळवायचे आहे तर पेट्रोल-डीजेलच्या किंमती कमी कराव्या लागतील. सरकारने प्रॉमिस केले आहे की, येत्या काळात भाव कमी होतील. या अपेक्षेवर जग सुरु आहे.'


पेट्रोलच्या किंमती कमी असणे गरजेचे आहे - नेहा मेहता, टीव्ही अभिनेत्री
किंमती वाढवून सरकार खजाना जमा करतेय. पेट्रोल खुप महत्त्वाची गोष्ट आहे. आज पायी चालण्यासाठी वेळ नाही. वाहन गरजेचे झाले आहेत. याच्या उपयोगासाठी पेट्रोलच्या किंमती कमी असणे गरजेचे आहे.

 

असे वाटतेय पेट्रोल 100 रुपये लीटर होईल - शशांक व्यास, टीव्ही अॅक्टर
पेट्रोलवर जीएसटी लावा. मग पेट्रोलचे पेट्रोल आणि पाणीचे पाणी होईल. जर वॅट, एक्साइज ड्यूटी, सेल्स टॅक्स काढून जीएसटी लावला, तर सहाजिकच किंमत कमी होईल. इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड एवढे महाग नाही. आपल्या शेजारी राष्ट्रांमध्येही एवढी किंमत नाही. कुणी याचा विरोधही करत नाही. सर्व आपल्या कामात मस्त आहेत. असे वाटते की, पुढे चालून पेट्रोल 100 रुपये लीटर होईल.


अक्षयने डिलीट केले ट्वीट
अभिनेता अक्षय कुमारने 2011 आणि 2012 मध्ये पेट्रोल-डिजेलच्या वाढत्या किंमतीवर प्रश्न उपस्थित केले होते. आता त्याच्या मौनावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले तर त्याने त्याचे जुने ट्वीट डिलीट केले. या ट्वीटमध्ये क्राँग्रेस सरकारला घेरत लिहिले होते की - पेट्रोलच्या किंमती वाढत राहिला तर येणा-या दिवसात प्रत्येकाला सायकल खरेदी करावी लागेल.


पुढील स्लाइडवर जाणून घ्या, कोण-कोणत्या सेलेब्सने पेट्रोलच्या किंमतींवर दिल्या रिअॅक्शन...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...