आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • First Female Comedian Of Indian Cinema Uma Devi Khatri Aka Tuntun Birth Anniversary

Bday spl: टुनटुनसोबत लग्न केल्यानंतर पाकिस्तान सोडून भारतात आले होते काजी, स्वतः दिलीप कुमारच्या होत्या फॅन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: 1947 मध्ये भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान अख्तर अब्बास काजीला लाहौर (पाकिस्तान) जावे लागले होते. टुनटुन ज्यावेळी दिल्ली येथी आपल्या नातेवाईकांकडे हात होत्या, तेव्हा काजी एक्साइज ड्यूटी इंस्पेक्टर होते. काजी नेहमीच उमा देवीची मदत करायचे, यामुळे उमा त्याच्यावर प्रभावित झाल्या होत्या. काजी गेल्यानंतर उमा देवी यांनाही दिल्ली आवडली नाही. त्या आपली गाण्याची आवड पुर्ण करण्यासाठी घरातून पळून मुंबईत आल्या.


लाहौरमध्ये रमले नाही काजी
फाळणीनंतर काजी हे लाहोरमध्ये रमले नाही. काही काळानंतर तेसुध्दा मुंबईत आले. काजी आणि उमा देवीने 1947 मध्येच लग्न केले. त्यावेळी उमा देवी यांचे वय 24 वर्षे होते.
- उमा देवी यांनी अफसाना लिख रही हू... नंतर जवळपास 47 गाण्यांना आपला आवाज दिला. तर 200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनयही केला. 


दिलीप कुमारने बनवले होते टुनटुन

उमा देवीने लग्नानंतर चित्रपटांमध्ये गाणे बंद केले. नंतर कुटूंब चालवण्यासाठी पुन्हा कामाचा शोध घेत असताना त्या नौशाद यांच्याकडे आल्या. नौशाद उमा यांना म्हणाले की, तुम्ही चित्रपटात काम करायला पाहिजे. परंतू येथेही उमाने एक अट ठेवली की, त्या फक्त आवडता अभिनेता दिलीप कुमार यांच्यासोबतच काम करतील.
- त्यावेळी दिलीप कुमार बाबुलची शूटिंग करत होते. उमा देवीसोबत एक सीन करताना दिलीप कुमार यांनीच त्यांना टुनटुन नाव दिले होते. तेव्हापासून आतापर्यंत उमा देवींना टुनटुन नावानेच ओळखले जाते.


लता नाही टुनटुन गाणार होत्या हे गाणे
1949 मध्ये कमाल अमरोहीचा चित्रपट 'महल'चे गाणे आएगा आने वाला... पहिले उमा देवी गाणार होत्या. परंतू कारदार स्टूडिओसोबत बांधिल असल्यामुळे त्या दूस-या स्टूडिओच्या चित्रपटात गाणे गाऊ शकत नव्हत्या. यामुळे कमाल अमरोहीने हे गाणे लता मंगेशकर यांना दिले.
- या गीतानंतर लता मंगेशकर फिल्म इंडस्ट्रीच्या सर्वात आवडता आवाज बनल्या होत्या.
 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...