आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Poster: मलाला यूसुफजईचा बायोपिक 'गुल मकई'चे मोशन पोस्टर झाले रिलीज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : नोबेल पुरस्कार विजेती मलाला यूसुफजईच्या बायोपिक 'गुल मकई'चे पोस्टर मंगळवारी रिलीज करण्यात आले. अमजद खानच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटात मलालाची भूमिका रीम शेखने साकारली आहे. रीम यापुर्वी  ‘ना आना इस देस लाडो’ आणि ‘दीया और बाती हम’ सारख्या टीव्ही शोजमध्ये दिसली आहे. या चित्रपटात अतुल कुलकर्णी, दिव्या दत्ता, पंकज त्रिपाठी आणि स्व. ओम पुरीसारखे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट कधी रिलीज होणार याची माहिती अजून समोर आलेली नाही.


कोण आहे मलाला?
मलाला पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांताच्या स्वात जिल्ह्यातील मिंगोरामध्ये राहणारी आहे. तिने वयाच्या 11 वर्षापासून 'गुल मकई' नावाच्या आपल्या डायरीच्या माध्यमातून तालिबान विरुध्द अभियान सुरु केले होते. तालिबानने मुलींनी शाळेत जाऊ नये याचे फर्मान काढले होते. तरीही तिने मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करण्याचे अभियान सुरु ठेवले.
अक्टोबर 2012 मध्ये शाळेतून परतताना मलालावर आतंकवाद्यांनी हल्ला केला. तिला डोक्यावर गोळी लागली. तिला उपचारासाठी लंडन येथे नेण्यात आले. तिथे ती पुर्णपणे बरी झाली. तिने तिथेच आपले शालेय शिक्षण पुर्ण केले. मलालाला तिच्या या धाडसासाठी जगभरात सन्मानित करण्यात आले. 2014 मध्ये तिला कैलाश सत्यार्थी यांच्यासोबत शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...