आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लिओनी बनली \'वीर महादेवी\', पहिल्यांदा वॉरिअर प्रिंसेसच्या भूमिकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सनी लिओनी तामिळ चित्रपटात डेब्यू करतेय. तिचा पहिला तामिळ चित्रपट  'Veer mahadevi' चा फर्स्ट लूक समोर आलाय. या पीरिअड ड्रामा चित्रपटात सनी लीड रोल (वॉरिअर प्रिंसेस) मध्ये दिसणार आहे. V C Vadivudayan च्या डायरेक्शनमध्ये हा चित्रपट तयार होतोय. रिपोर्टनुसार हा चित्रपट याचवर्षी फेब्रुवारीमध्ये फ्लोरवर आला होता. 


सनीने चित्रपटासाठी घेतली स्पेशल ट्रेनिंग
- रिपोर्ट्सनुसार, सनीने चित्रपटासाठी स्पेशल ट्रेनिंग घेतली आहे. तिने घोडस्वारी शिकली यासोबतच तलवारबाजीची ट्रेनिंग घेतली. सनीने या चित्रपटासाठी 150 दिवस दिले आहेत. मेगा बजेटमध्ये तयार होत असलेला हा चित्रपट तामिळसोबतच, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये रिलीज होणार असे बोलले जातेय. बॉलिवूड विषयी बोलायचे झाले तर सनी शेवटच्यावेळी 'तेरा इंतजार' 2017 मध्ये दिसली होती.

 

बातम्या आणखी आहेत...