आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Box Office: पहिल्याच विकेंडला 'पॅडमॅन' ने केली जबरदस्त कमाई, वाचा किती कमावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन' ने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. चित्रपटाने पहिल्याच वीकेंडमध्ये जवळपास 40 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास 10.26 कोटी रुपयांची कमाई केली होती. शनिवारी चित्रपटाने जवळपास 13.68 कोटी रुपयांची कमाई केली. तर रविवारी चित्रपटाने जोर धरला आणि 16 कोटींची कमाई केली. तीन दिवसांचे कलेक्शन मिळून अक्षयच्या चित्रपटाने विकेंडमध्ये जवळपास 40 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरन आदर्श आणि रमेशा बाला यांनी यासंदर्भात ट्वीटरवरुन माहिती दिली आहे. 

 

100 कोटी क्लबमध्ये एन्ट्री घेणारा अक्षयचा सलग सहावा चित्रपट...
- 100 कोटी क्लबमध्ये एन्ट्री घेणारा पॅडमॅन अक्षय कुमारचा सलग सहावा चित्रपट ठरेल. 
- यापूर्वी त्याचे एअरलिफ्ट, हाउसफुल 3, रुस्तम, जॉली एलएलबी 2 आणि टॉयलेट एक प्रेमकथा हे चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील झाले आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा चित्रपटाचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...