आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - अनुष्का-विराट कोहली यांच्या सेलिब्रिटी कपलचे दुसरे वेडिंग रिसेप्शन 26 डिसेंबरला मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झाले. यावेळी बॉलिवूड, क्रिकेट आणि कॉर्पोरेट जगतातील अनेक दिग्गज आले होते. यावेळी कंगना रनोट आणि करण जोहर एकमेकांना टाळतांना दिसले. तर, दुसरीकडे काही अनोळखी लोकांनी रिसेप्शनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.
- अनुष्का शर्माची मॅनेजर रितिका नागपालकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का-विराटच्या रिसेप्शनसाठी हॉटेलने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. असे असतानाही 5 अज्ञात लोकांनी पार्टीमध्ये घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
- रितिका नागपालने सांगितल्यानुसार, जेव्हा या लोकांना त्यांचे इनव्हिटेशन कार्ड दाखवण्याची विनंती केली तेव्हा त्यांचे बिंग फुटले. त्यानंतर बाऊन्सर्सने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.
- मुंबईतील लोअर परळ येथील सेंट रेजिस हॉटेल हायप्रोफाइल इव्हेंट होस्ट करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
- अनुष्का-विराटच्या रिसेप्शन दरम्यान हॉटेलने प्रत्येक एंट्री पॉइंट आणि एक्झिटवर डबल चेकिंग पोस्ट तयार केल्या होत्या. कपलने त्यांचे खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले होते, याशिवाय हॉटेलने सुरक्षा रक्षकांची फौज उभी केलेली होती. एक्स्ट्रा बाऊंन्सर्स तैनात केले होते.
- रिसेप्शनला येणाऱ्या प्रत्येकावर बारकाईने नजर ठेवण्यासाठी साध्या वेषातील सुरक्षा रक्षकही होते. जेणे करुन कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि निमंत्रण नसलेली एकही व्यक्ती आत घुसणार नाही याची दक्षता घेतली जात होती.
- त्याचेवळी एक वयोवृद्ध महिला रिसेप्शनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होती, त्यावेळी रितीका नागपालने तिला पोलाइटली तिथून जाण्याची विनंती केली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.