आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Death anniversary: अल्पायुषी ठरल्या गीता दत्त, करिअर आणि वैवाहिक आयुष्यात करावा लागला अन्यायाचा सामना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या गोड आवाजाने हिंदी तसेच, बंगाली चित्रपटसृष्टीत वेगळेच स्थान निर्माण करणा-या गायिका म्हणजे गीता दत्त. गीता दत्त यांनी वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी 20 जुलै 1972 रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांनी आपल्या छोट्याशा फिल्मी करिअरमध्ये प्रत्येक प्रकारची गाणी गायली आणि सर्वच हिट ठरली.

 

26 मे 1953 रोजी प्रसिद्ध अभिनेते गुरुदत्त यांच्यासोबत लग्नानंतर गीता रॉय या गीता दत्त झाल्या. कोमल आवाजाची देणगी लाभलेल्या या गायिका मात्र अल्पायुषी ठरल्या. 1946 ते 1966 या 20 वर्षांच्या काळात गीता दत्त यांनी अनेक प्रकारची, वेगवेगळ्या ढंगाची, मूड्सची आणि बाजाची गाणी गायिली.

 

सुरमयी करिअरची सुरुवात...
गीता दत्त यांची अनेक अवीट गोडीची गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या कानावर रेंगाळत आहेत. त्याकाळातील लोकप्रिय गायिका लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यापेक्षा त्यांचा आवाज अगदी वेगळा होता. गीता यांनी ललिता पवार यांचे पती आणि कंपोजर हनुमान प्रसाद यांच्याकडून गायनाचे धडे गिरवले. त्यांनीच या टॅलेंटेड गायिकेला बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. वयाच्या 16 व्या वर्षी गीता यांनी सिनेसृष्टीतील त्यांचे पहिले गाणे गायले होते. 1947 साली हनुमान प्रसाद यांच्या 'भक्त प्रहलाद' या पौराणिक चित्रपटातील ‘सुनो-सुनो हरी की लीला सुनाए...’ हे गाणे गायले होते. खरं तर त्यांना फक्त दोनच ओळी गायला मिळाल्या होत्या. पण काहीच ओळीतूनच त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते.

 

एस.डी.बर्मन यांच्यासाठी गायली 72 गाणी... 
गीता दत्त यांना ‘जोगन’ या चित्रपटातील गाण्यांमुळे प्रसिद्ध मिळाली. त्यांनी गायलेले ‘मैं तो गिरधर के घर जाऊँ...’ हे गाणे आजही रसिकांच्या लक्षात आहे. मेरा सुंदर सपना बित गया (दो भाई), बाबूजी धीरे चलना(आर पार), ना जाओ सैय्या छुडाके बैंय्या (साहब बीबी और गुलाम) या आणि यांसारख्या अनेक अवीट गोडीची गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या कानावर रेंगाळत आहेत. एस. डी. बर्मनसुद्धा गीता दत्त यांच्या आवाजामुळे अतिशय प्रभावित झाले होते. त्यांनी एस. डी. बर्मन यांच्यासाठी 72 गाणी गायली, त्यापैकी 43 सोलो गाणी होती. 1947-1949 या काळात त्यांनी आपल्या गोड आवाजाने बॉलिवूडवर राज्य केले होते.  


गीता दत्त आणि गुरुदत्त यांची भेट.. 

'बाजी' या चित्रपटाच्या रेकॉर्डिंगदरम्यान गीता आणि गुरु दत्त यांची पहिली भेट झाली होती. हळूहळू दोघांमध्ये प्रेम जुळले. त्यानंतर 26 मे 1953 रोजी दोघांनी लग्न केले. गीता आणि गुरु दत्त यांना तीन मुले झाली. 

 

वहिदा रहमानमुळे उठले संसारात वादळ...
गीता आणि गुरुदत्त यांचा सुखी संसार सुरु होता. पण अभिनेत्री वहिदा रहमान यांच्यामुळे त्यांच्या संसारात वादळ आले. गुरु दत्त आणि वहिदा रहमान यांचे अफेअर त्याकाळी खूप गाजले होते. त्यामुळे गुरु दत्त आणि गीता दत्त यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण होऊ लागले. कौटुंबिक समस्या वाढत गेल्यामुळे त्यांनी हळूहळू गाणे कमी केले होते. याकाळात त्यांच्या हातून अनेक प्रोजेक्ट्स निघून गेले होते. गुरुदत्त यांच्या चित्रपटांसाठी केले होते पार्श्वगायन...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या सविस्तर...
 

 

बातम्या आणखी आहेत...