आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Geeta Kapoor Daughter Claims Body Says She Didnt Know Mom Was Ailing In Old Age Home

मुलीने गुपचूप पद्धतीने केले पाकीजाच्या अभिनेत्रीचा अंतिम संस्कार, मुलगा अखेरपर्यंत नाही आला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'पाकीजा'सह इतर 100 चित्रपटात काम करणारी अभिनेत्री गीता कपूर रविवारी अंतिम संस्कार करण्यात आले. गीता कपूरला एक वर्षापूर्वी मुलगा राजा कपूर हॉस्पीटलमध्ये सोडून पळाला होता. मरेपर्यंत त्या त्यांच्या मुलाची आठवण काढत होत्या.

 
इतक्या दिवस त्यांची काळजी घेणाऱ्यांनी ठरवले की सोमवारपर्यंत त्यांच्या मुलाची वाट   पाहिली जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार केला जाईल. मुलगा अखेरपर्यंत आला नाही पण त्यांची मुलगी समोर आली आणि तिने गुपचूप पद्धतीने आईवर अंत्यसंस्कार केले. मुलीने अंतिम संस्कार करताना काळजी घेणाऱ्यांना बोलावलेही नाही...

 

जेव्हा गीता कपूर यांचा मुलगा त्यांना हॉस्पीटलमध्ये सोडून पळाला होता तेव्हा 
जेव्हा गीता कपूरच्या मुलाने त्यांना हॉस्पीटलमध्ये सोडून पळ काढला तेव्हा फिल्ममेकर अशोक पंडीत आणि रमेश तौरानी यांनी गीता यांची काळजी घेतली. या लोकांनी हॉस्पीटलचे दीड लाखाचे बील चुकवले. गीता कपूर यांची मुलगी आराध्याने डेड बॉडी क्लेम केली. तिने सांगितले की ती एअर होस्टेस आहे आणि ज्या प्रायव्हेट एअरलाईन्समध्ये ती एअर होस्टेस आहे ते प्लेन महाराष्ट्राचे सीएम वापरतात. अशोक पंडित यांनी सांगितले की, आम्ही आराध्याला सांगितले की त्यांच्या अंतिम संस्काराबद्दल फिल्म इंडस्ट्रीतील लोक, ओल्ड एज होम आणि डॉ्क्टरांना माहिती द्यावी म्हणजे त्यांच्या अंतिम संस्कारात सहभागी होता येईल पण आराध्याने तसे करण्यास नकार दिला. 
  
मुलीने दिली अजब सफाई..
आराध्या इतके दिवस कुठे होती? तिने तिच्या आईची काळजी का नाही घेतली हे जेव्हा अशोक पंडीत यांनी विचारले तेव्हा तिने सांगितले की तिला तिच्या आईच्या आजारपणाबद्दल काहीच माहिती नव्हती. तिला माहित नव्हते की तिची आई ओल्ड एज होममध्ये आहे. तिच्या या वक्तव्यावर अशोक पंडीत म्हणाले की आम्ही यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही कारण आम्हाला माहीत होती की आराध्या खोटे बोलत आहे.प्रश्न हा आहे की कोणती मुलगी वर्षभरापासून तिची आई कुठे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नाही का?

 

हॉस्पीटलमध्ये सोडून पळाला होता मुलगा..
- मागील वर्षी 21 एप्रिल रोजी लो ब्लड प्रेशन असल्याने गीता कपूर यांचा कोरिओग्राफर मुलगा राजा कपूरने त्यांना  गोरेगांव, मुंबई येथील SRV हॉस्पीटलमध्ये त्यांना अॅडमिट केले आणि त्यानंतर त्याने तिथून पळ काढला. एक महिन्याहून जास्त दिवस झाले पण राजा त्यांना पाहायला किंवा घ्यायला आला नाही त्याने फोनवरही बोलण्यास नकार दिला.


- 'पाकीजा' (1972) आणि 'रजिया सुल्तान' यांसारख्या चित्रपटात काम केलेल्या गीता यांची रडून रडून तब्येत खराब झाली जेव्हा त्यांना कळाले की त्यांचा मुलगा त्यांना सोडून पळाला आहे. 
- जेव्हा प्रोड्युसर रमेश तौरानी आणि अभिनेता अशोक पंडीत यांना या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी जाऊन गीता कपूर यांची दखल घेतली आणि हॉस्पीटलनंतर ओल्ड एज होममध्ये पाठवले

 

 पुढच्या स्लाईडवर पाहा, गीता कपूर यांचे अखेरच्या काळातले काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...