आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपाल दास नीरज: वयाच्या 6 व्या वर्षी झाले अनाथ, यमुना नदीतून जमा करत होते पैसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: गोपाल दास नीरज हे बॉलिवूडमधील एक प्रसिध्द गीतकार होते. गोपाल दास यांचा जन्म यूपीमधील इटावा येथे झाला. परंतू वयाच्या शेवटापर्यंत ते अलीगढमध्ये राहिले. आजारपणामुळे त्यांना वयाच्या 93 व्या वर्षी दिल्लीत आणण्यात आले आणि तिथेच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी ब-याच काळापुर्वी 'अब तो मजहब कोई ऐसा भी चलाया जाए, जिसमे इंसान को इंसान बनाया जाए...' हे गीत लिहिले होते. हे गीत आजच्या काळासाठी परफेक्ट बसते. 

 

वयाच्या 6 व्या वर्षी हरपले पितृछत्र
- समाजवादी पार्टीच्या मागच्या सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीचा दर्जा देण्यात आला होता. 2007 मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2011 मध्ये त्यांनी इंडियन एक्स्प्रेससोबत आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या होत्या. वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले होते. 10 वी नंतर त्यांना शिक्षण सोडावे लागले. त्यांच्यावर कुटूंबाची जबाबदारी आले. एक काळ असा होता, जेव्हा त्यांना पैशांसाठी जमुना नदीमध्ये उतरुन भाविकांनी नदीमध्ये फेकलेले नाणे जमान करावे लागत होते. ते म्हणाले होते की, "मी खुप लहान-लहान कामं केली. माझी पीजी पुर्ण झाल्यानंतर मी टायपिस्टचे काम केले. काही दिवस मी सरकारसाठी काम केले. परंतू मला त्यांची सिस्टिम आवडली नाही." 

 

देवआनंद होते नीरज यांचे फॅन
गोपाल दास नीजर यांनी अलीगढ येथे राहणा-या आर चंद्रा यांच्या 'नयी उमर की नयी फसल'साठी गाणे लिहिले. हा चित्रपट चालला नाही. परंतू गाणे खुप प्रसिध्द झाले. एका कार्यक्रमात प्रसिध्द अभिनेता देव आनंद यांनी त्यांना 'कारवां गुजर गया' गाणे गाताना ऐकले तेव्हा ते खुप प्रभावित झाले. आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी ते त्यांना मुंबईत घेऊन आले. मुंबईमध्ये गोपाल दास नीरज यांनी 'प्रेम पुजारी' चित्रपटासाठी गीत लिहिले. गाणे रिलीज झाल्यानंतर त्यांनी इतिहास रचला. 'फूलों के रंग से' आणि 'रंगीला रे' हे गाणे खुप प्रसिध्द झाले. या गाण्याला एस डी बर्मन यांनी संगीत दिले होते. या गीतांसाठी कॉन्ट्रॅक्ट साइन करण्यापुर्वी 'नीरज' दादा यांना 1000 रुपये मिळाले होते. 'रंगीला रे' गाणे लिहीतांना त्यांना सुरुवातीलाच या दोन शब्दांचा वापर करण्यास सांगण्यात आले होते. हा गाणे ऐकल्यानंतर देवआनंद नीरज यांचे शेवटपर्यंत फॅन राहिले. देव आनंद आयुष्याच्या अखेरपर्यंत नीरज यांच्या संपर्कात होते असे बोलले जाते. नीरज यांनी देव आनंद यांचा शेवटचा चित्रपट चार्जशीटसाठीही गीत लिहिले होते असे बोलले जाते. 

बातम्या आणखी आहेत...