आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 मुलांच्या आईने या अॅक्टरवर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप, आता मागतोय 1 अब्ज रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : काही दिवसांपुर्वी पाकिस्तानी आणि बॉलिवूड अॅक्टर अली जफरवर सिंगर मीशा शफीने लैंगिक शोषणाची केस दाखल केली होती. या प्रकरणी मीशाने सोशल मिडियावर लिहित त्याच्या चरित्रावर अनेक आरोप लावले होते. आता अलीने मीशाविरुध्द शनिवारी मानहानीचा दावा केला आहे. यामध्ये त्याने 1 अब्ज रुपयांचा दावा केला आहे. 


असे म्हणाला अली जफर

- जफरने नोटिसमध्ये म्हटले की, 'मीशाने खोटे आणि मला बदनाम करणारे आरोप लावले आहेत.'
- 'यामुळे माझी प्रतिष्ठा, प्रतिमेला खुप नुकसान पोहोचले आहे. बदनामी करणारे जे आरोप माझ्यावर लावण्यात आले आहेत ते खुप चुकीचे आहेत. असे आरोप माझ्यावर लावून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वाईट हेतूने ही लढाई सुरु करण्यात आली आहे.'

 

मीशाने लावले होते असे आरोप
मीशाने #MeToo कँपेनच्या माध्यमातून ट्वीटरवर लिहिले होते, 'इंडस्ट्रीमध्ये राहत असताना मला अली जफरने माझे अनेक वेळा लैंगिक शोषण केले. मी जेव्हा दोन मुलांची आई होते तेव्हा माझ्यासोबत असे झाले. मला आणि माझ्या कुटूंबासाठी हा खुप मोठा धक्का होता.'
- 'अलीला मी अनेक वर्षांपासून ओळखते. त्याच्यासोबत मी स्टेज शेअर केला आहे. त्याच्या या व्यवहारामुळे मला वाईट वाटते आणि मला माहिती आहे की, मी एकटी नाही.'
- फक्त मीशानेच नाही तर अलीवर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता.
- जर्नलिस्ट महाम जावेदने ट्वीटरवर लिहिले होते की, 'एकदा अलीने तिच्या कजिनला जबरदस्ती Kiss केले होते. एवढेच नाही तर तिला रेस्टरुममध्ये ओढून नेले होते. नशीबाने कजिनचे फ्रेंड्स जवळ होते. त्यांनी अलीला धक्का देऊन बाजूला केले.'
- मेकअप आर्टिस्ट लीना घानने लिहिले, 'मी दिर्घकाळपासून अलीसोबत काम करतेय. फ्रेंड्ससोबत तो अनेक वेळा गैरवर्तन करतो. महिलांसोबत वाईट व्यवहार करतो. अलीच्या अश्लील कमेंट आजही लक्षात आहेत. त्याला महिलांना सन्मान देता येत नाही हे त्यावरुनच कळते.'

बातम्या आणखी आहेत...