आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Harshvardhan Kapoor Film Bhavesh Joshi Superhero Trailer Out अनिल कपूरच्या मुलाच्या दुस या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

\'हीरो पैदा नहीं होता... बनता है\', अनिल कपूरच्या मुलाच्या दुस-या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'भावेश जोशी सुपरहीरो\'च्या ट्रेलरमध्ये सहकलाकारासोबत हर्षवर्धन कपूर - Divya Marathi
\'भावेश जोशी सुपरहीरो\'च्या ट्रेलरमध्ये सहकलाकारासोबत हर्षवर्धन कपूर

मुंबईः दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानींच्या आगामी 'भावेश जोशी सुपरहीरो' या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी रिलीज झाला. या चित्रपटात अभिनेते अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर लीड रोलमध्ये आहे. हर्षवर्धनचा हा दुसरा चित्रपट आहे. यामध्ये तो एका सुपरहीरोच्या भूमिकेत झळकतोय. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आल्यानुसार, सुरुवातीला तो कागदापासून मास्क तयार करुन सुपरहीरोचा लूक धारण करतो आणि लोकांना न्याय मिळवून देतो. याचे व्हिडिओजदेखील तो बनवतो. पण या प्रकरणाला हळूहळू राजकीय रंग चढतो. नंतर भावेश जोशी नावाची व्यक्ती प्रत्यक्षात हीरो बनते आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी रात्रीच्या अंधारात बाहेर पडते.  ट्रेलरमध्ये एक संवाद आहे,  'हीरो पैदा नहीं होता... बनता है.' ट्रेलरमध्ये अॅक्शन सीन्सचा तडका आहे. हा चित्रपट इरोस इंटरनॅशनल, रिलायन्स एंटरटेन्मेंट, विकास बहल आणि अनुराग कश्यप यांची निर्मिती आहे. येत्या 25 मे रोजी चित्रपट रिलीज होतोय. 

 

पुढील स्लाईडवर बघा,  'भावेश जोशी सुपरहीरो' या चित्रपटाचा ट्रेलर 

बातम्या आणखी आहेत...