आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिण सोनम कपूरच्या करिअरविषयी हर्षवर्धनने केली कमेंट, सोशल मीडियावर यूजर्सने केले ट्रोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरला नुकतेच टिकेला बळी पडावे लागले. त्याने त्याची बहिण सोनम कपूरविषयी वादग्रस्त विधान केले. एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत हर्षवर्धन सोनमच्या करिअरविषयी बोलला. तो म्हणाला की, बहिण वेगळ्या दुनियेत राहते. तिने प्रत्येक प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतू यामध्ये तो असे काही बोलला जे सोशल मीडिया यूजर्सला आवडले नाही.


हर्षवर्धन म्हणाला - अॅक्ट्रेसेस राहू शकतात जास्त फ्री...
- हर्षवर्धनने या मुलाखतीत सांगितले की, "सोनमला 'पॅडमॅन'साठी 100 दिवस देण्याची गरज नव्हती. कारण हा चित्रपट तिच्यावर जास्त फोकस्ड नव्हता" यासोबतच हर्षवर्धन म्हणाला की, अॅक्ट्रेसेस जास्त फ्री राहू शकतात. परंतू आमच्यासाठी हे सोपे नसते, कारण चित्रपटाची पुर्ण जबाबदारी आमच्या खांद्यावर असते. हर्षवर्धननुसार तो सोनमचा जास्त सल्ला घेत नाही. 

 

टिका झाल्यावर हर्षवर्धनने दिले स्पष्टीकरण
- हर्षवर्धनने स्टेटमेंट केले होते की, 'अॅक्ट्रेसेस जास्त फ्री राहू शकतात' सोशल मीडिया यूजर्सला हे पसंत पडले नाही. यामुळे त्याच्यावर टिका करण्यात आली. एका सोशल मीडिया यूजरने उपहासात्मक लिहिले की, "तुम्ही खरंच भावेश जोशी चित्रपटाच्या यशाचे वाटेकरी आहात. आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे की, तुझ्या जबाबदारीवर भावेश जोशी चालावा." असेच अनेक कमेंट्स यूजर्सने केल्या. यावर हर्षवर्धनने ट्वीट करुन स्पष्टीकरण दिले की, "जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवू नलोक आरोप लावत असतील, तर काहीच केले जाऊ शकत नाही. मी असे कधीच बोललो नाही. मी वेगळ्या दृष्टीने बोललो होतो आणि मीडियाने ते चुकीच्या पध्दतीने छापले."


- हर्षवर्धन कपूरचा 'भावेश जोशी' आणि सोनम कपूरचा 'वीरे दी वेडिंग' 1 जूनला रिलीज झाला. 'वीरे दी वेडिंग' सुपरहिट ठरला तर 'भावेश जोशी' सुपर फ्लॉप ठरला. यापुर्वी हर्षवर्धनचा डेब्यू चित्रपट 'मिर्ज्या' फ्लॉप ठरला होता.

बातम्या आणखी आहेत...