आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीमूनसाठी गेलेली 'ही' अभिनेत्री पतीसह सापडली इतक्या मोठ्या संकटात, हेलिकॉप्टरने वाचवले दोघांचे प्राण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी चित्रपट 'हेट स्टोरी'मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पाओली दामचे मागील महिन्यात लग्न झाले आहे. लग्नानंतर हनीमूनला स्वित्झर्लँड येथे गेलेली पाओली मोठ्या संकटात सापडली. खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या बर्फाच्या वर्षावामुळे पाओलीची तब्येत खराब झाली. वातावरणात झालेल्या या अचानक बदलामुळे केवळ पाओलीच नाही तर तेथील पर्यटकही अडकले आणि या सर्वांना एका हेलिकॉप्टरने दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले. 
 
पाओलीने 4 डिसेंबर रोजी गुवाहाटी येथील रेस्टॉरंट मालक अर्जून देबसोबत लग्न केले. काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. हनीमूनसाठी हे दोघे स्वीत्झर्लँडला गेले होते पणतिथे ते वेगळ्याच अडचणीत सापडले. 

 

खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या बर्फवृष्टीमुळे पाओली आणि तिच्या नवऱ्याची तब्येत खराब झाली. स्नो फॉलमुळे त्यांचे नेटवर्कही बंद पडले. बर्फामुळे सर्व रेल्वे ट्रॅक जाम झाले होते. रिझॉर्टमध्ये दोघांची तब्येत फार खालावली आणि मग त्यांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुरधित ठिकाणी पोहचवण्यात आले. दोघांची तब्येत आता ठिक असल्याचे समजते. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, पाओली दामच्या लग्नाचे काही खास PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...