आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडची ‘क्वीन’ राजकारणात प्रवेश करणार! वाचा काय आहे बातमीमागचे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या ठाम भूमिका आणि बेधडक वक्तव्यांमुळे प्रकाशझोतात असलेली अभिनेत्री कंगना रनोट सध्या तिच्या आगामी ‘मणिकर्णिका…’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. पण यासोबतच कंगना राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांनीही चांगला जोर धरला आहे. पण आता यावर कंगनाकडून स्पष्टीकरण आले आहे. 

 

कंगनाने आतापर्यंत बऱ्याचदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असून तिच्या अभिनयाने आणि समजूतदारपणाने मोदींचे मन जिंकले आहे. जवळपास वर्षभरापूर्वीसुद्धा कंगनाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपलं योगदान दिलं होतं. जेथे एका व्हिडिओच्या माध्यमातून तिने स्वच्छतेचं महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. एकंदर सरकारी उपक्रमांमध्ये तिचं योगदान आणि स्थानिक राजकारणात चांगलं काम करण्याची इच्छा या साऱ्याच्या बळावर ती हिमाचल येथूनच राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्याची चर्चांना उधाण आले आहे. पण कंगनाच्या प्रवक्त्यांनी तिचा राजकारणातील प्रवेश ही केवळ एक अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. 


काय आहे स्प्ष्टीकरण... 
कंगनाच्या प्रवक्त्यांनी म्हटले, की कंगना एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. तिने यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतल्याचे या बातम्यांमध्ये म्हटले गेले आहे. पण या सर्व बातम्या चुकीच्या आहेत. कंगनाने राजकारणात रस नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय ती सध्या बिकानेर येथे 'मणिकर्णिका' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. याशिवाय येणा-या काळात ती आणखी काही चित्रपटांमध्ये व्यस्त होणार आहे. त्यामुळे तिच्यासंदर्भात येणा-या या बातम्यांवर विश्वास ठेऊ नये.   

 

काय होती अफवा... 
कंगना हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील मतदार संघातून भाजपाच्या बाजूने राजकारणात उतरु शकते, यासाठी ती या भागातील राजकारण आणि एकंदर त्यादृष्टीने असणारं वातावरण या सर्व गोष्टींविषयी जाणून घेत असल्याची चर्चांना उधाण आले होते. पण आता कंगनाच्या वतीने स्पष्टीकरण आल्याने तिच्या राजकारणातील प्रवेशाविषयी सुरु असलेल्या चर्चांना नक्कीच पुर्णविराम मिळाला.  

 

पुढे वाचा, कंगनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेले ऑफिशिअल स्टेटमेंट...

बातम्या आणखी आहेत...