Home »News» Hindi Actors On Womens Period Problem

मासिक पाळीबद्दल प्रथमच मोकळेपणाने बोलले हिंदी कलाकार, करिनापासून वरुण धवननेही दिले आपले मत

दिव्य मराठी वेब टीम | Jan 11, 2018, 15:56 PM IST

प्रत्येक महिलेला महिन्यातील 7 दिवस पीरीएडच्या समस्येतून जावे लागते. समाजात आजही ते 7 दिवस महिलांना वाळीत टाकण्याचे काम करतात. अनेक ठिकाणी आजही महिला या समस्येवर मोकळेपणाने बोलत नाहीत. मासिक पाळी येणे हा महिलांच्या शरीराचा एक फार महत्त्वाचा भाग आहे आणि तरीही यावर कधी चर्चा होत नाही त्यामुळे याविषयीचे चुकीचे मत समाजात व्यक्त होताना दिसते.

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट पॅडमॅन या महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणार आहे आणि त्यामुळे बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रेटी या विषयावर बोलताना दिसले. अनेक जणांनी या विषयावर त्यांचे रोखठोख मत मांडले.

1, करिना कपूर
करिना कपूर खानने एका कार्यक्रमादरम्यान महिलांच्या या गोष्टीवर मत व्यक्त केले. ती म्हणाली, "मला आनंद होतो की महिला आता या गोष्टीबाबत केवळ चार भिंतीत नव्हे तर सर्वांसमोर मोकळेपणाने बोलतात."

2. परिणीती चोप्रा
परिणीती चोप्राचा प्रश्न आहे की महिला मासिक पाळीसारख्या विषयावर बोलायला का घाबरतात. तिने सांगितले की तीसुद्धा एका छोट्याशा शहरातून आली आहे जिथे मासिक पाळीच्या काळात महिलांवर अनेक बंधने लादण्यात येतात. यावेळी मंदिरात न जाणे, डोक्यावरुन अंघोळ न करणे, लोणच्याला हात न लावणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.

पुढच्या स्लाईडवर वाचा, पीरीएडबद्दल काय बोलताय वरुण, श्रद्धा आणि इतर कलाकार..

Next Article

Recommended