आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिनाने सांगितला तिचा बर्थडे प्लान- भारतात नाही, बाहेर करणार सेलिब्रेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ 16 जुलैला (मंगळवारी) आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या ती कुटूंबासोबत देशाबाहेर हॉलिडे एन्जॉय करतेय. ती वाढदिवस भारता बाहेर सेलिब्रेट करणार आहे. तिने PTI न्यूज एजेंन्सीला आपल्या बर्थडे प्लानिंगविषयी सांगितले.


कुटूंबासोबत सेलिब्रेशन
कतरिना म्हणाली, "माझ्यासाठी वाढदिवसाचा अर्थ म्हणजे आपल्या कुटूंबासोबत चांगला टाइम स्पेंड करणे असते. कुणी मला याची आठवण करुन देईल यावर माझा विश्वास नाही. मी प्रत्येक वर्षी माझा बर्थडे चांगला जाईल याचा प्रयत्न करते. मी माझ्या बहिणींसोबत देशाबाहेर राहणार आहे. मला या दिवशी खुप आनंद होतो. हा दिवस मस्ती आणि आरामाचा असतो."

 

परतल्यानंतर शूटिंगमध्ये व्यस्त
कतरिना म्हणाली की, "मी परतल्यानंतर, आनंद एल रायचा चित्रपट 'झिरो'च्या शूटिंगमध्ये व्यस्त होईल. मला चित्रपटासाठी गाणे शूट करायचे आहे. कतरिना 'झिरो चित्रपटात शाहरुख खान आणि अनुष्कासोबत दिसणार आहे. ती आमिर खानसोबत 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये दिसणार आहे. सलमानसोबतचा तिचा 'टायगर जिंदा है' हा चित्रपट यशस्वी ठरला आहे."

 

कतरिनाचे कुटूंब 
- कतरिनाचे वडिल काश्मीरी आहेत तर आई सुजान ब्रिटिश आहे. ते 8 भावंड आहेत. 2018 मध्ये ती दोन चित्रपटात झळकणार आहे. आमिर खानसोबत 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' आणि शाहरुख खानसोबत 'झिरो' चित्रपटात ती दिसणार आहे. 
- कॅटच्या कुटूंबात स्टीफन, क्रिस्टिन, नताशा, मेलिसा, सोनिया, ईसाबेल आणि भाऊ मायकलचा समावेश आहे.
- सलमानने कतरिनाची लहान बहीण ईसाबेलला लॉन्च करण्यासाठी चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली आहे. 

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...