आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - 'बिग बॉस'नंतर सलमान खान आता लवकरच 'दस का दम' या शोमधून प्रेक्षकांना भेटणार आहे. हा शो 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा टीव्हीवर येत आहे. यापूर्वी 2008 मध्ये हा शो आला होता. आणि आता हा शो एका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या शोसाठी सलमान खानला तब्बल 78 कोटी रुपये मानधन घेणार आहे. एक वेबसाइटशी बोलताना चॅनलचे बिझनेस हेड दानिश खान यांना जेव्हा सलमानच्या फीसबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले- मी तिरसट प्रश्नांना तशीच उत्तर देतो.
- जेव्हा दानिश यांना विचारण्यात आले होते की, या गेम शोला सलमान खान आपल्या स्टाइलमध्ये सादर करणार, तेव्हा ते म्हणाले- ही वृत्त 100 टक्के चुकीची आहे. असे काहीही नाही.
- यावरून स्पष्ट होते की सलमानला या शोला त्याच्या फॉर्मेटनुसारच चालवावे लागणार आहे. तथापि, दानिश यांच्या गोलमाल उत्तरांमुळे हेही खात्रीचे नाही की, सलमान खानला 78 कोटी रुपये मिळतील. हा शो सोनी चॅनलवर 4 जूनपासून सुरू होईल.
सलमानने होस्ट केले होते दोन सीजन्स...
जून 2008 ते ऑक्टोबर 2009 पर्यंत सलमान खानने या गेम शोचे दोन सीझन्स होस्ट केले. आमिर खान, कॅटरिना कैफ, कंगना रनोट, रितेश देशमुख, अजय देवगण, राणी मुखर्जी, गोविंदा, जितेंद्र, अरबाज खान, कैलाश खेर यासारखे अनेक सेलेब्सनी या शोमध्ये गेस्ट म्हणून हजेरी लावलेली आहे.
पुढच्या स्लाइड्सवर, 10 का दम शोमध्ये सलमान खान आणि इतर सेलेब्सचे PHOTOS...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.