आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिक रोशनने खरेदी केली 3.8 कोटींची गाडी, असे आहे त्याचे CAR चे कलेक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड स्टार्स लग्जीरिअर कारसाठी खुप क्रेझी असतात. याच कारणांमुळे त्याच्याकडे जगातील सर्व मोठ्या ब्रांड्सच्या कार असतात. ऋतिक रोशनने नुकतीच एस्टन मार्टिनची रॅपिड एस कार खरेदी केली. दिल्लीच्या एक्स शोरुममध्ये याची किंमत 3.8 कोटी आहे. हृतिक दोन्ही मुलासोबतच कारमध्ये फिरताना दिसला. त्याने सिल्वर कलरची कार घेतली आहे. एस्टन मार्टिनचा रॅपिड एस भारतात सर्वात जास्त विकले जाणारे मॉडल आहे.


काय आहे या कारची विशेषता
- रॅपिड एस कार 6.0 लीटरच्या V12 इंजिनसोबत येते. जे 552 बीएचपीच्या पावरसोबत 620 एनएमचा टार्क जनरेट करते. यामध्ये 8 ऑटोमेटिक ट्रान्समिशन गिअर आहेत.
- रॅपिड एस फक्त 4 सेकंडमध्येच 100 ची स्पीड पकडते. याची जास्ती जास्त स्पीड 327 किमीत प्रती तास एवढी आहे.
- यासोबतच या गाडीमध्ये थ्री स्टेज डायनेमिक कंट्रोल, एबीएस (अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम), ईबीडी(इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन) आणि एयरबॅक्ससारख्या सुविधा आहेत.


रणवीर सिंहजवळ आहे एस्टन मार्टिन...
रणवीर सिंहनेही 2017 मध्ये एस्टन मार्टिन एस कार खरेदी केली आहे. आपल्या 32 व्या वाढदिवशी रणवीरने ही कार खरेदी केली होती. हृतिकची गाडी सिल्वर आहे. तर रणवीरची गाडी व्हाइट शेडमध्ये आहे.


हृतिकजवळ आहेत या लग्जरी CARS...
एस्टन मार्टिन रॅपिड एससोबतच ऋतिकजवळ रॉल्स रायस घोस्ट, पोर्शे साएने टर्बो एस, रेंज रोव्हर वोग, मर्सिडीज मॅबेक आणि मर्सिडीज बेंज एस क्लाससारख्या लग्जरी गाड्या आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ऋतिक रोशनच्या एस्टन मार्टिन आणि दूस-या लग्जरी कारचे कलेक्शन...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...