आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिक रोशनच्या मॅनेजरने चोरली सोन्याची नाणी, आता कंगनाने दिला मदतीचा हात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड सेलिब्रेटींच्या आयुष्यात त्यांच्या मॅनेजरचे खूप महत्त्व असते. शूटिंगच्या वेळा, तारखा, फिस आणि दिवसभरातील घडणाऱ्या सर्वच गोष्टींवर मॅनेजरची भूमिका मोठी असते. गेल्या काही वर्षात प्रोफेश्नलिजममुळे मॅनेजरशिवाय बॉलिवूड सेलिब्रेटींना काम करणे मुश्किल होते.

 

अशाचप्रकारे हृतिक रोशनला त्याची मॅनेजर अंजली अथावर खूप विश्वास होता आणि हृतिकचे डेली वर्कची ती मुख्य होती पण एक दिवस असे घडले की हृतिक रोशनला राग आला आणि त्याने अंजलीला कामावरुन काढून टाकले. अंजलीला कामावरुन काढून का टाकले याविषयी गोष्ट ऐकाल तर तुम्हाला भरोसा वाटणार नाही.  

 

हृतिक रोशनने डायरेक्टर आशुतोष गोवारीकरने 'जोधा अकबर' आणि 'मोहोंजोडादो' या चित्रपटात काम केले आहे आणि दोघेही खूप चांगले मित्र आहेत. एक दिवस हृतिक रोशनने एक गुडविल जेस्चर म्हणून 21 सोन्याचे सिक्के त्यांना भेट म्हणून दिले 

आशितोष हृतिकच्या या वागण्याने फार खुश झाले आणि त्यांनी हॉतिकला फोन लावत 11 सोन्याचे सिक्के पाठवल्याबद्दल हृतिकचे आभार मानले. परंतू हे ऐकल्यावर हृतिकचे डोके फिरले कारण त्याने 11 नव्हे तर 21 सिक्के पाठवले होते. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, हृतिकला त्याच्या मॅनेजरचा प्रचंड राग आला आणि त्याने तात्काळ अंजलीला मॅनेजरपदावरुन हटवले. जेव्हा माध्यमांना अंजलीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने बोलण्यास नकार दिला. आता अशी बातमी आहे की अंजलीला कंगनाने तिची मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, हृतिक तसेच अंजलीचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...