आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Supar-30 साठी ऋतिकचा फर्स्ट लुक, येथे होतेय चित्रपटाची शूटिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅथमॅटिशियन आनंद कुमारच्या बायोपिक 'सुपर-30' ची शूटिंग वाराणसीमध्ये सुरु झाली आहे. चित्रपटात ऋतिक रोशन आनंद कुमारच्या भूमिकेत आहे. ऋतिक पहिल्यांदा शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मंगळवारी या चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आला. यामध्ये तो सेम टू सेम आनंद कुमारसारखा दिसतोय. चित्रपटाची शूटिंग पुढचे 4 दिवस वाराणसीच्या लोकेशन्स सुरु राहिल असे बोलले जात आहे. 

 

रामनगर फोर्टमध्ये लावलाय पटना यूनिव्हर्सिटीचा सेट
- हा चित्रपट बिहारच्या एका प्रसिध्द मॅथमॅटिशिअन आनंदर कुमार यांच्या आयुष्यावर आहे.
- चित्रपटाचे डायरेक्टर आणि रायटर विकास बहल आहेत. चित्रपटात ऋतिकसोबतच जीशान अय्यूब, अॅक्ट्रेस मृणाल ठाकुरही आहेत.
- ऋतिकने 22 जानेवारीला सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिले होते की, "मी सुपर-30 ची सुरुवात करणार आहे, यामध्ये मी पहिल्यांदा टीचरची भूमिका प्ले करत आहे."
- 2 फेब्रुवरीला ऋतिक टीमसोबत बाबतपुर एयरपोर्टवर स्पॉट झाला होता. यावेळी त्याच्यासोबत सुनील शेट्टी होता.
- काशीच्या रामनगर फोर्टमध्ये पटना यूनिव्हर्सिटीचा सेट लावण्यात आला आहे. येथे आनंद कुमारला डिग्री मिळण्याचा सीन शूट केला जाईल. यानंतर बलुआ घाटावर शूटिंग केली जाईल.
- 3 फेब्रुवारीला ऋतिकने टीमसोबत मिर्जापुरच्या अहरौरामध्ये शूटिंग होणा-या ठिकाणांची पाहणी केली. येथेही शूटिंग होणार आहे असे बोलले जातेय.

देशातील बेस्ट 30 विद्यार्थ्यांना करुन देतात IIT ची तयारी
- आनंद कुमार देशातील सिलेक्टेड 30 विद्यांर्थ्यांना मोफतमध्ये आयआयटीची तयारी करुन देतात.
- येवढेच नाही तर प्रत्येक वर्ष आनंद कुमार यांच्या संस्थान सुपर - 30 मधून IIT मध्ये मुलं सिलेक्ट होतात.


हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांना शेअर केली संघर्षाची कथा
- सिप्टेंबर 2017 मध्ये आनंदर कुमार हे अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसले होते.
- अमिताभ बच्चन यांनी त्यांना विचारले की, शिवकण्याची युक्ती कुठून सुचली. 
- यावर ते म्हणाले की, वडिलांच्या अचानक मृत्यूमुळे मी घरोघरी जाऊन पापक विकायचो. त्यावरच माझे घर चालत होते.
- यानंतर मला सांगण्यात आले की, मी शिकवावे. शिकवायला बसलो तर सुरुवातीला दोन मुलं होते. दोन्हीही पळून गेले. मग असे वाटले की, जीवनात काहीच करु शकत नाही.
- यानंतर गरीबांना शिवकण्याची आयडिया डोक्यात आली. आई म्हणाली की, मुलांसाठी जेवण बनवले, भाऊ म्हणाला मी मॅनेजमेंट पाहिल. यानंतर ही प्रोसेस सुरु झाली.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...